आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



पंढरपूर Live 14  August 2017 

मंगळवेढा प्रतिनिधी 
                                  सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आणि अभ्यासू आमदार  मा . प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स तर्फे खाते अंतर्गत क्रिकेट आणि आट्यपाट्याच्या स्पर्धांचे दिनांक १२ ते १४  ऑगस्ट या कलावधीत आयोजन करण्यात आले होते .     
            या स्पर्धांचे उदघाटन मंगळवेढा क्रिकेट आसोसिएशनचे अध्यक्ष डॉ :शरद शिर्के यांच्या शुभ हस्ते व युटोपियन शुगर्सचे कार्यकारी संचालक मा . उत्तमराव पाटील यांचे सह सर्व खाते प्रमुख यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले या सर्व स्पर्धा मंगळवेढा येथील महाराणा क्रिकेट संघाचे कर्णधार अनिल पाटील आणि ढगे डिजिटलचे संचालक मा . लहू ढगे या पंचाच्या मार्गदर्शना 
सर्व सामने शांततेत व शिस्तमय वातावरणामध्ये संपन्न झाले.
                    स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी बोलताना डॉ. शिर्के म्हणाले की,आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युटोपियन शुगर्स ने आयोजित केलेल्या या स्पर्धा म्हणजे कर्मचारी वर्गांच्या मध्ये सांघिक भावना निर्माण करण्याबरोबरच मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. युटोपीयन ने या पुढे ही ही परंपरा अशीच चालू ठेवावी त्यास 
मंगळवेढा क्रिकेट आसोसिएशनचे नेहमीच सहकार्य राहील.
                  या वेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणले की , कर्मचारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने दर वर्षी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आम्ही नियोजन करीत आहोत, या आंतर विभागीय स्पर्धांबरोबरच आम्ही या ठिकाणी दि. 27 व 28 ऑगस्ट या कलावधीत जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धांचे ही आयोजन केले आहे .  
गत वर्षी आम्ही आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धांचा  uउदंड प्रतिसाद विचारात घेता अत्यंत चोख नियोजन आम्ही आता पासूनच करीत आहोत. तरी जिल्ह्यातील आट्या पट्या संघांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धे मध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन ही श्री पाटील यांनी केले.
          
अतंत्य चुरशीने झालेल्या सामन्यांमध्ये सर्वच खेळाडूंनी आप-आपली कला दाखवण्याचे प्रयत्न केला . परंतु इंजिनिरिंग विभागाने क्रिकेट व आत्यापट्या या दोन्ही सामन्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले .
              सदरच्या सर्व स्पर्धांचे सूत्रसंचालन व समालोचन सेल अकाऊंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले.
फोटो ओळी :
1.आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसा निमित्त युटोपीयन शुगर्स आयोजित अंतर विभाग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना 
मंगळवेढा क्रिकेट आसोसिएशनचे अध्यक्ष डॉ :शरद शिर्के,स्पर्धेचे पंच मंगळवेढा येथील महाराणा क्रिकेट संघाचे कर्णधार अनिल पाटील आणि ढगे डिजिटलचे संचालक मा . लहू ढगे,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व सर्व खाते प्रमुख,खेळाडू दिसत आहेत
 छाया :- सागर राजमाने



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




_____________________________________


Post a Comment

0 Comments