स्वेरीला यश मिळावे ही साक्षात विठ्ठलाचीच इच्छा - माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे स्वेरीचा २०वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 18  August 2017 





पंढरपूर- ‘सुरवातीला पत्र्याच्या शेडमध्ये उभे असलेले अभियांत्रिकी महाविद्यालय पुढे एवढी मोठी मजल  मारतील असे मुळीच वाटले नव्हते. पहिल्यांदा तृटी काढल्यानंतर दुसऱ्या वेळी माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यानंतर पायाभरणी देखील माझ्या हातूनच झाली, परंतु आज रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झालेले पाहून मनस्वी आनंद होत आहे. स्वेरीचे आज राज्यात नाव झाले असून आणखी प्रगती पथावर जाणार आहे यासाठी रोंगे सर तुम्ही तुमचे कार्य असेच सुरु ठेवा स्वेरीला अजून खूप पल्ला गाठायचे आहे. आज विद्यार्थी प्रवेश क्षमता, वार्षिक निकाल व कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी यात जिल्ह्यात अग्रेसर आहे. हे देखील प्रगतीचे लक्षण आहे. २० वर्षानंतर पुन्हा मला कोणतेही पद नसतानाही बोलविण्यात आले. ही बाब आणि स्वेरीला नियमित यश मिळावे ही साक्षात विठ्ठलाचीच इच्छा आहे.’ असे प्रतिपादन राज्याचे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांनी केले.
        येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य ओपन थिएटरमध्ये स्वेरीच्या २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजिलेल्या मल्टीपर्पज इमारतीच्या कोनशिलेचे उदघाटन माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रारंभी योगीराज ईनामदार महाराज यांनी श्री व सौ राणे दाम्पत्यांच्या शुभहस्ते पूजा करून घेतल्यानंतर कोनशिलेचे उदघाटन करण्यात आले. माजी मंत्री राणे यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘ ज्ञान प्रबोधिनीचा देव विठ्ठल रथ थांबवू नका,पुढे चालवा हीच प्रार्थना’ असा मौलिक संदेश दिला. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून २० वर्षाच्या परिश्रम पूर्वक वाटचालीतील महत्वाचे टप्पे, शैक्षणिक क्षेत्रातील राबवीत असलेले विविध प्रयोग, त्याला मिळालेले यश,संशोधन क्षेत्रातील प्रगती, मिळालेला निधी आदी सविस्तर माहिती दिली. सुभाष भोसले,आश्रयदाते उद्धव बागल, व सी.पी.बागल यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील या तरुणांची अथक परिश्रमाची तळमळ पाहून आम्ही त्यांना जे मदत केले त्याचा आनंद आम्हाला मिळाला असून विध्यार्थ्यांनो तुम्ही देखील अंगी प्रचंड जिद्ध व चिकाटी बाळगा.अनेकवेळा पडल्यानंतरही पेटून पुन्हा उठा यश तुम्हाला नक्की मिळेल.स्वेरीचे सर्व विश्वस्त कष्टाळू आहेत.’ पुढे बोलताना माजी मंत्री राणे म्हणाले की, ‘ मी राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यास करता असतां स्वेरीचे नाव आवर्जून निघते . येथील शिस्त आणि सुसंस्कार यामुळे विद्यार्थ्यामध्ये होत असलेला बौद्धिक विकास हे भविष्याच्या दृष्टीने प्रगतीचे लक्षण आहे.असे संस्कारित तंत्र शिक्षण देणे अत्यंत महत्वाचे आहे. वाचन संस्कृती टिकवली पाहिजे कारण वाचनातूनच संस्काराचे धडे मिळत असतात. तर रोंगे सरांनी माझ्या ऐवजी पदावर असणारे अधिकारी, मंत्री यांना बोलविता आले असते परंतु त्यांना कोणताही मोह नाही हे यावरून सिद्ध होते. विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या शिक्षण संस्थेकडेच समाज झुकतो यामुळे या जबाबदारीची जाणीव पालकांना आहे म्हणूनच स्वेरीत प्रवेशाला प्राधान्य देतात आणि स्वेरीला शैक्षणिक क्षेत्रात आघाडी मिळत आहे.’ असे सांगितले. यावेळी स्वेरीचे यश पाहून माजी मंत्री राणे यांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले. 
यावेळी संस्थेस देणगी देणाऱ्या उद्योजक सी.पी. बागल, संभाजीराजे आसबे, चंद्रकांत राणे, शिवराज कंट्रक्शनचे वडगावे, गोरखनाथ सावंत, उद्धव बागल, तसेच स्वेरी परिवारातील सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचे पालकांसह माजी मंत्री राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी श्रीपाद थिटे,सुभाष भोसले, गणपतराव भोईर, गोपाळपूरचे सरपंच सौ विमलताई आसबे, बापूसाहेब कोंडेकर, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, डॉ.भाकरे, नलवडे-पाटील, सूर्यवंशी, प्राचार्य पडवळकर,पालक प्रतिनिधी केवळे, अॅड.जवळ,सौ जवळ, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी.रिसवडकर, माजी अध्यक्ष व विश्वस्त व्ही.एस.शेलार, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, एच. एम.बागल, विश्वस्त एन.एम.पाटील, एच.एच.शेख, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एम.कागदे, विश्वस्त बी.डी.रोंगे, सौ राणे, सौ प्रेमलता रोंगे, सौ, रोंगे, सौ नाडगौडा, पंढरपूर पंचक्रोशितील पत्रकार, डॉक्टर, वकील, समाजसेवक, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या अभियांत्रिकी व फार्मसीचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, चारही महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा यशपाल खेडकर यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले तर संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सायंकाळी प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरबद्ध ‘काव्यरंग’ कार्यक्रमाने विशेष रंगत आणली.यावेळी पाहुणे व पालकांच्या वाहनांच्या पार्किंग पासून भोजनाची सोय अत्यंत उत्तमरित्या करण्यात आली होती.
छायाचित्र- १.येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज इमारतीच्या कोनशीलेचे उदघाटन राज्याचे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोबत डावीकडून माजी अध्यक्ष व विश्वस्त व्ही.एस.शेलार, सौ शेलार, सौ राणे, माजी मंत्र राणे, विश्वस्त एन.एम.पाटील, संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, सौ प्रेमलता रोंगे, सौ नाडगौडा, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी नाडगौडा. २. राज्याचे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी नाडगौडा सोबत डावीकडून माजी अध्यक्ष व विश्वस्त व्ही.एस.शेलार, विश्वस्त एन.एम.पाटील, संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, श्री नाडगौडा , श्री राणे, सौ राणे, सौ नाडगौडा, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एम.कागदे, गोपाळपूरचे सरपंच सौ विमलताई आसबे व आदी ३.स्वेरीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्याचे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे सोबत  मान्यवर.
 From-
Shri. Santosh  C. Halkude
Pandharpur - 413 304. 
Mob: 9545 55 36 28, 
          9850 24 21 55 .


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments