शिष्यवृत्ती योजनेसाठी आराखडा तयार करा -केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 18  August 2017 


         पंढरपूर,दि.18मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे लाभ मिळावेत यासाठी आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करा अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केल्या
            केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आज पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस आमदार भारत भालके, उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, तहसिलदार मदूसूदन बर्गे सामाजिक न्यायविभागाचे राहूल काटकर, जिल्हा समाज कल्याणचे अशोक मेटकरी उपस्थित होते.
            केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रथम सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती घेतली. मागासवर्गीय विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये  यासाठी सामाजिक न्याय विभागाने विविध योजना आखल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी योजना निहाय आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जावी, असे त्यांनी सांगितले
            सामाजिक आणि जातीय सलोखा राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर तसेच संवाद साधण्यावर भर द्यावा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील आंतर जातीय विवाहाच्या प्रमाणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती सर्व लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे त्यांनी सांगितले.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Post a Comment

0 Comments