लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018
अवघ्या महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून आलेल्या तब्बल साडेतीन लाखाहूनही अधिक श्रीविठ्ठल भक्तांचा मेळा भुवैकुंठ पंढरी नगरीत आज माघी वारीच्या निमित्ताने जमा झाला होता. चंद्रभागा नदीचे पवित्र स्नान,नगरप्रदक्षिणा आणि सावळ्या विठूरायाचे दर्शन घेवून भाविक विठोबाच्या नामात दंग झालेले पहावयास मिळाले.
माघी वारीसाठी यंदा लाखोंच्या संख्येने भाविक आल्याने चंद्रभागा, वाळवंट, मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाल्याने आसमंतात हरिनामाचा जयघोष दुमदुमला असल्याचे पहावयास मिळाले. मंदिर समितीने यात्रेसाठी विशेष स्वच्छता अभियान राबविल्याने यात्रादिवशीच शहर व परिसरात सर्वत्र स्वच्छता पहावयास मिळाली.
धावती वारी म्हणून मानल्या जाणार्या माघी यात्रेसाठी कोकण,मराठवाडा,कोल्हापूर,सांगली या भागासह कर्नाटक राज्यातील अनेक वारकरी दरवर्षी न चुकता येतात. यंदाच्या वर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने भाविकांच्या संख्येत वाढ झाली. पंढरीत येणार्या भाविकांना सोयी सुविधा देण्यास प्रशासनाने तयारी केली होती. चंद्रभागा नदीला पुरेसे पाणी असल्याने रविवारी पहाटे पासून ऐन थंडीतही भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये स्नान केले. त्यानंतर भाविकांनी नगरप्रदक्षिणा करून विठ्ठलाचे दर्शन घेतले. एकादशी दिवशी म्हणजे रविवारी पदस्पर्श दर्शन रांग ही गोपाळपूर पर्यंत जाऊन पोहाचली होती. या रांगेतून श्री विठठलांच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 8 ते 9 तासांचा कालावधी लागत होता. तसेच मुखदर्शनासाठी 2 तासांहून अधिक कालावधी लागत होता. एकादशीच्या दिवशी 1 मिनिटाला 30 ते 35 भाविकांनी दर्शन घेतले. यादिवशी सुमारे 20 ते 21 हजार भाविकांनी पददर्शन तर 30 हजार भाविकांनी मुखदर्शन सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेतले होते. शनिवारी 31 हजार 989 भाविकांनी विठ्ठलाचे पददर्शन घेतले.
रविवारी एकादशींची नित्यपूजा ही मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसकर यांच्या हस्ते व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी देखिल सपत्नीक विठठलांची पूजा केली. या वेळी समिती सदस्या शंकुतला नडगिरे उपस्थित होत्या. माघी एकादशीसाठी शनिवारी रात्री उशीरापर्यंत एसटी बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनामधून मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी पंढरीत येत होती. त्यामुळे शहरातील प्रमुख असणारे संत गजानन महाराज संस्थान , वेदांता भक्तनिवास , संत तनपुरे मठ तसेच विविध मठ,धर्मशाळा भाविकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते. रविवारी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी स्टेशनरोडवर खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी रस्त्यावरील फेरीवाल्यांना बाजूला करताना पोलिसांसह नगरपालिका प्रशासनाला मोठी तारेवरची कसरत करावी लागली. यंदा पहिल्यांदाच माघी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक आल्याने बाजारामधील उलाढाल चांगली झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे नोटबंदी व जीएसटीचा त्रास सहन करावा लागणार्या व्यापार्यांना काही प्रमाणात माघी वारीने दिलासा दिल्याचे पहावयास मिळाले. यात्रा सुखरूप पार पाडण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सहा.पो.अधिक्षक निखील पिंगळे, मुख्याधिकारी अभिजित बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, शहर पोलिस प्रमुख विठ्ठल दबडे आदींनी परिश्रम घेतले.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments