पंढरपूर भाजपाच्या वतीने निवृत्त सैनिकांचा सत्कार, संविधान पूजन-वाचन, ध्वजवंदन व एकता यात्रेने प्रजासत्ताक दिन साजरा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018

 भारताच्या सीमेवर आपली कामगिरी बजावलेल्या निवृत्त सैनिकांचा पंढरपूर भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भावपूर्ण वातावरणामध्ये सत्कार करण्यात आला. (छाया : गणेश गोमासे)

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात विविध उपक्रमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या समारोहाला भाजपा कार्यकर्त्यांसह शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, निवृत्त सैनिक उपस्थित होते. निवृत्त सैनिकांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. शहरामध्ये या अभिनव कार्यक्रमाची सर्वच स्तरातून चर्चा होऊ लागली होती. सीमेवर लढत असताना प्राणाची बाजू लावून मातृभूमिच्या रक्षणासाठी कशाचीही पर्वा न करता प्राणाची आहुती देण्यास तयार असणार्‍या सैनिकांचा यथोचित गौरव होणे ही काळाची गरज आहे. पंढरपूर भाजपाने हा मान पटकावत पंढरपुरात अशा प्रकारचा कार्यक्रम होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. या कार्यक्रमाने निवृत्त सैनिकांनाही समाज आपली दखल घेतो, या जाणिवेने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आनंदित केले व त्यांनी आपल्या भावना मनोगतामधून व्यक्त करताना प्रकट केल्या.
सीमेवर लढणारा तडफदार सैनिक समाजाच्या प्रेमाने गहिवरून जातो, हे चित्र पंढरपूरकरांना पहावयास मिळाले. त्यामुळेच या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे पंढरपूरकरांनी तितक्याच आत्मियतेने दखल घेऊन पंढरपूर भाजपाचे या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले. 69 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने झेंडावंदन व एकता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. इंदिरा गांधी भाजी मार्केट समोरच्या तपकिर चौकात पंढरपुरातील ज्येष्ठ व्यापारी प्रभुदयाल खंडेलवाल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यानंतर राष्ट्रसंदेश असणारे फलक घेऊन एकता यात्रा काढण्यात आली.
ही यात्रा तपकीर गल्ली, चौफाळा, शिवाजी चौक, स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आली. यावेळी संविधानाचे वाचन व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या यात्रेत शहर कार्यकारणी, महिला आघाडी, युवा मोर्चा, युवती आघाडी, ओबीसी आघाडी, झोपडपट्टी सेल, विविध आघाडी व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा शकुंतला नडगिरे, शहर सरचिटणीस रेखा कुलकर्णी, महिला आघाडी प्रमुख अपर्णा तारके, राज्य प्रांतिक सदस्य बाबासाहेब बडवे,सरचिटणीस कैलास कारंडे, चिटणीस नितीन धोत्रे, व्यापारी सेलचे नितीन करंडे, सौदागर मोळक, उपाध्यक्षा डॉ. प्राजक्ता बेणारे,  राम चौगुले, श्याम तापडीया, उमेश ढोबळे, आनंद कुलकर्णी, अमृत कुलकर्णी, आनंद नगरकर, सुप्रिया वाईकर, हर्षदा नगरकर, पूजा बोरामणीकर, प्रियांका भंडारे, आदित्य जोशी, कल्पना तिताडे, संजय पालकर, अनिल शिंदे, निलेश चव्हाण, आशपाक बागवान, सतीश सासवडकर, महादेव आदापुरे, सुरेंद्र कवठेकर तसेच भाजयुमोचे शहराध्यक्ष विदुल अधटराव, युवती प्रमुख देवयानी दामोदरे, लखन ननवरे, किरण खडाखडे, दादासाहेब धोत्रे, लखन माळी तसेच पक्ष कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
डॉ. प्राजप्ता बेणारे यांनी संविधान वाचन केले. यावेळी माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव, सुनिल सर्वगोड, डी. राज सर्वगोड यांनी मनोगत व्यक्त केले. सीमेवर प्राणाची बाजी लावून देशवासियांचे रक्षण करणार्‍या सहा माजी सैनिकांचा सत्कार करून कार्याचा गौरव करण्यात आला. चंद्रकांत कोळी मेजर, राजाराम मारूती ढगे, सुरेश गणपत पाटील, नामदेव गोपीचंद शिलवंत, जयेंद्र मच्छिंद्र बंगाळे, विष्णू गणपबत हेंबाडे या माजी सैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले.

...आणि निवृत्त सैनिकांचा
कंठ दाटून आला!
भाजपाच्या वतीने पंढरपुरात प्रथमच प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजवंदनाबरोबरच सीमेवर आपला जीव धोक्यात घालून भारतमातेच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता लढणार्‍या निवृत्त सैनिकांचा भावपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. हे सर्व माजी सैनिक सध्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीमध्ये आपली सेवा रूजू करत आहेत. निवृत्त झाल्यानंतर त्यांचा पंढरपुरामध्ये अशा प्रकारचा सत्कार प्रथमच होत असल्याने त्यांनाही हा सर्व सत्कार समारंभ पाहून गहिवरून आले व आपले मनोगत व्यक्त करत असताना काही सैनिकांनी तर सद्गदीत होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा प्रकारची माजी सैनिकांची दखल समाजामध्ये फारशी घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना भाजपाने केलेल्या या सत्काराबद्दलचे अप्रुप वाटले व त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

... या सैनिकांचा झाला सत्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर संविधानाचे पूजन केल्यानंतर देशासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या सहा निवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये
निवृत्त सैनिक विष्णू हेबाडे यांनी 24 वर्षे सीमेवर सेवा बजावली. त्यांनी बक्सर, पंजाब, कारगिल, ओरीसा, श्रीनगर, ग्लेशियर, कच्छ भूभाग येथे सेवा बजावली आहे. त्यांचा सत्कार ज्येष्ठ व्यापारी प्रभुदयाल खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आला. 
निवृत्त सैनिक चंद्रकांत कोळी यांचा सत्कार आरपीआय नेते सुनिल सर्वगोड यांनी केला. कोळी यांनी पंजाब, श्रीनगर, कारगिल, ग्लेशियर, राजस्थान येथे 18 वर्षे सेवा बजावली.
निवृत्त सैनिक राजाराम ढगे यांचा सत्कार डी. राज सर्वगोड यांनी केला. ढगे यांनी 17 वर्षे पंजाब, श्रीनगर, कारगिल, राजस्थान येथे सेवा बजावली.
निवृत्त सैनिक सुरेश पाटील यांनी 17 वर्षे सीमेवर सेवा केली. त्यांचा सत्कार शकुंतला नडगिरे यांनी केला. पाटील यांनी श्रीनगर, राजस्थान, पंजाब येथे सेवा केली.
निवृत्त सैनिक नामदेव शिलवंत यांचा सत्कार सौदागर मोळक यांनी केला. त्यांनी सीमेवर 17 वर्षे सेवा बजावली. श्रीनगर, कारगिल, ग्लेशीयर, अरूणाचल प्रदेश, गुजरात, पुणे, वाघा बॉर्डर येथे त्यांनी सेवा केली.
निवृत्त सैनिक जयेंद्र बंगाळे यांनी 17 वर्षे सीमेवर सेवा केली. त्यांचा सत्कार कांतीलाल सुपेकर यांनी केला. बंगाळे यांनी जम्मू, श्रीनगर, राजस्थान, सागर, कच्छ भूभाग, कारगिल येथे सेवा बजावली आहे.



पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments