कर्जबाजारीपणाला कटांळुन शेतकर्यांची आत्महत्या:मुलीच्या लग्नासाठी घेतले होते कर्ज:खालापुरी येथील घटना

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018


निलेश चाळक शिरूर-:तालुक्यातील खालापुरी येथे  एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे, नारायण नानाभाऊ लोंढे वय(४०) असे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
मयत नारायण हे अल्पभूधारक शेतकरी असून मुलीच्या लग्नासाठी एका सावकाराकडून त्यांनी ६० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यासाठी सावकाराने त्यांची एक एकर जमीन नावाची करून घेतली होती. सावकाराने जमीन नावाची करून घेतल्याने नारायण चिंतेत होते. व्याजाची नियमित परतफेड सुरु होती; परंतु मुद्दल कशी फेडायची या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. यातून सोमवारी रात्री त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. शिरुर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रात्री जिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात मयत नारायण लोंढे यांच्या पत्नी सरस्वती लोंढे यांनी सावकरावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. त्यामुळे रुग्णालयात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. उशिरापर्यंत पोलिसांत नोंद नव्हती.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments