लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड :प्रतिनिधी
श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव(ता.गेवराई) येथे वै.ब्रम्हनिष्ठ गुरूवर्य महंत ह.भ.प.वामन महाराज गिरी यांच्या ४६ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त महंत वै. महादेव महाराज (नारायण गड) व ह.भ.प निगमानंद महाराज यांच्या शुभार्शिवादाने व महंत ह.भ.प महंत दत्ता महाराज गिरी यांच्या अध्यक्षतेखाली अखंड हरिनाम सप्ताहास दि.१८ जानेवारी ला प्रारंभ झाला होता. तर या सप्ताहाची दि.२५ जानेवारी गुरुवार रोजी गडाचे महंत ह.भ.प दत्ता महाराज गिरी यांच्या सुश्राव्य काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता झाली.यावेळी गंगाधर महाराज, जिल्हा परिषद बांधकाम सभापती युधाजीत पंडित, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पंडित,शिवाजी महाराज गिरी,हनुमान महाराज गिरी, गिताभाभी बाळराजे पवार,पंचायत समिती सदस्य परमेश्वर खरात, महादेव औटी,यांच्या सह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या सप्ताहात गेल्या सात दिवसापासून महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तन कारांनी आपली सेवा देवुन किर्तन,प्रवचन, नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा,संगित भजन अदि कार्यक्रम संपन्न झाले आहेत तर या सप्ताहाची दि.२५ जानेवारी रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत महंत ह.भ.प दत्ता महाराज गिरी (श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव) यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता झाली.
यावेळी काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलताना महंत दत्ता महाराज गिरी यांनी सांगितले की गोरक्षनाथ संस्थान या ठिकाणी पहीले दंडक आरण्य होते. भगवान गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने ही भुमी पावन झालेली आहे. तर वै. वामन महाराज गिरी यांनी या दंडक आरण्या मध्ये वास्तव्य केलेले आहे.वै.वामन महाराज हे महान तपस्वी होते त्यांनी समाजात जनजागृती चे महान कार्य केलेले आहे.तर आज या ठिकाणी त्यांच्या आर्शिवादाने एका रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.भाविकांच्या सहकार्याने विविध विकास कामे याठिकाणी झालेले आहेत. आणखी ही भविष्यात अनेक कामे याठिकाणी होणार आहेत.तर जिवनामध्येेे प्राजंंळ मनाने भगवंतांचे नामस्मरण करा.असे ही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.व किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर वेळी उध्दव पौळ, श्रीधर पौळ, रामबप्पा लेंडगुळे, बंडु बावचकर, नंदकुमार पौळ, यांच्या सह हाजारो भाविकांची मांदियाळी होती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments