लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2018
नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांनी व नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेणुकाताई घोडके जिजामाता, पद्मावती उद्यान,
हिंदु व लिंगायत स्मशान भुमीची पाहणी केली.
पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, महिला व बालकल्याण समिती सभापती रेणुका घोडके यांनी नगर अभियंता दिनेश शास्त्री यांचे समवेत शहरातील जिजामाता, पद्मावती उद्यान, हिंदु व लिंगायत स्मशान भुमीस भेट देवुन पाहणी केली. यावेळी उद्यानातील बंद असणारे सर्व कारंजे चालु करण्याबाबत व बागेतील लहान मुलांची सर्व खेळणी दुरुस्त करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. पद्मावती उद्यानातील कंपाऊंडची सुरक्षा भिंत काही समाज विघातक लोकांनी वारंवार पाडल्याची निदर्शनास येताच नगराध्यक्षांनी संबंधीत व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची सुचना यावेळी नगर अभियंता दिनेश शास्त्री यांना केली.
तसेच हिंदु स्मशान भुमीमध्ये प्रेत जाळण्यासाठीच्या ठिकाणी असणा-या खराब झालेल्या विटा त्वरीत बदलण्याबाबत सुचना दिल्या व लिंगायत स्मशान भुमीची रस्ता रुंदीकरणामध्ये पाडण्यात आलेली सुरक्षा भिंत बांधण्याबाबत संबंधीत विभागास लेखी पत्र देण्याबाबत सुचना केल्या. तसेच रस्ताच्या मधोमध असणा-या रस्ता दुभाजकावर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आलेली होती. परंतु मोकाट जनावरे वारंवार सदरची झाडे खात असल्याने त्याठिकाणी 2 फुट उंचीचे लोखंडी ग्रील बसविण्बाबत सुचना दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त बसवेश्वर देवमारे, अमित मोरे, धर्मराज घोडके हे उपस्थित होते.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments