ग्रामसभेत महीला संरपचांस धक्काबुक्की तर ग्रामसेवकास मारहाण:खुंटेफळ येथील प्रकार

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड-:आष्टी  तालुक्यातील खुंटेफळ येथे सोमवारी आयोजित ग्रामसभेत महिला सरपंचांस धक्कबुक्की करून ग्रामसेवकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ऐनवेळी इतर मुद्दे चर्चेस घेणाऱ्या ग्रामस्थांना रोखल्याने ही घटना घडली. याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा नोंद झाला.
पोलिसांच्या माहितीवरून,खुंटेफळ येथे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आशा स्वयंसेविकेच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात, पाणी फाऊंडेशन अंतर्गत वाँटरकप स्पर्धेत सहभाग नोंदवणे, खुंटेफळ साठवण तलावाअंतर्गत पुनर्वसन आणि इतर अत्यावश्यक विषयावर चर्चा करण्यासाठी सरपंच आरती सतीष मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा भरली होती. उपस्थितीपटावर ग्रामस्थांच्या सह्या घेण्याचे काम सुरु  असताना नंदाबाई दत्तू काकडे यांनी सभेच्या नियोजित विषयावर चर्चा न करता दुसराच विषय मांडण्याचा प्रयत्न केला. यावर सरपंचांनी आक्षेप घेत सभेत नियोजित विषयावरच बोला असे सुचविले. ग्रामसेवक संतोष बोडखे यांनीदेखील हेच समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी नंदाबाई दत्तू काकडे या बोडखे यांच्यावर  धावून गेल्या.संदीप दत्तू काकडे, रवींद्र रामदास थोरवे, रामदास केरू गाडे, किशोर रामदास थोरवे, नवनाथ रावसाहेब थोरवे, सुलभा नवनाथ थोरवे, गणेश गोरख थोरवे, उमेश शिवाजी थोरवे, संगिता रामदास थोरवे, राजू दत्तू काकडे आणि परमेश्वर रामदास थोरवे अशा एकूण १२ जणांनी  त्यांना  मारहा केली. यावेळी सरपंच आरती मुंगसे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील धक्काबुक्की करून अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली. या घटनेने ग्रामसभेत प्रचंड गोंधळ उडाला. यादरम्यान प्रोसिडिंग रजिस्टर देखील गहाळ झाले आणि उपस्थितीत रजिस्टरही फाडण्यात आले असे ग्रामसेवक बोडखे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
अंभोरा पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा व इतर कलमानुसार गुन्हा नोंद झाला आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments