अखेर तावशीच्या सरपंच , उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018

 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीचे सरपंच सोनाली गणपत यादव व उपसरपंच संजिवनी महादेव सातपूते यांच्यावर दि. 30 जानेवारी 2018 रोजी सरपंच आणि उपसरपंच यांचेवर अविश्वास ठराव मंजूर होणेबाबत दहा ग्रामपंचायत सदस्यांनी पंढरपूर तहसीलदार बर्गे यांना लेखी कळविले आहे .सरपंच, उपसरपंच मिळून संगनमताने सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज मनमानी पद्धतीने करीत आहेत. प्रत्यक्षात वस्ती आस्तीवात नसताना स्वःताच्या घरासमोर स्वःताच्या फायद्यासाठी वस्तीसाठी म्हणून रस्ता मंजूर करून घेऊन रस्ता स्वःताकरीता पदाचा गैरवापर करून आस्तीवात आणल्याचे स्पष्ट होत आहे. 

इतर अनेक प्रकारे सरपंच, उपसरपंच हे ग्रामपंचायतीच्या हिताविरूध्द व्यवहार करीत आहेत, पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या जागेवर किराणा दुकान चालू करून अतिक्रमण केलेलेे स्पष्ट होत आहे , सरपंच स्वःता लाभ मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून स्वःताचे नातेवाईक हितचिंतकाचे जागेतअंगणवाडीचे बांधकाम निविदा ठराव आस्तीवात आणून प्रत्यक्षात उजनी विभागाच्या तत्सम आधिकाऱ्याच्या जागेत अंगणवाडीचे बांधकाम करून शासनाची फसवणूक केलेचे निष्पन्न होत आहे अशा प्रकारचे    आरोप करीत दहा ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच आणि सरपंचाविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव दहा सदस्यांनी मिळून दाखल केला आहे त्यामुळे सरपंच सोनाली गणपत यादव  यांना सरपंच पदावरून तर संजिविनी महादेव सातपूते यांना उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे . 

तावशी ग्रामपंचायतीमध्ये एकूण तेरा सदस्य आहेत. सरपंचांनी आणि उपसरपंचानी मनमानी कारभार सुरु केला होता. सरपंचांचे पती आणि उपसरपंचाचे पती ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करतात, नागरिकांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत, विकास कामांना अडथळे निर्माण करतात आदी मुद्देसह ठराव दाखल करण्यात आला. यावेळी सरपंच पद दोन वर्षे आणि उपसरपंच पद हे एक वर्षासाठी सर्वानुमते ठरले असताना काहीतरी कारण सांगून राजीनामा देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत होते. स्वःताला सावित्रीच्या लेकी समजणाऱ्या सरपंच आणि उपसरपंच यांनी राजीनामा न दिल्याने अखेर त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला आहे असेच म्हणावे लागेल. यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच / उप सरपंच ( अविश्वास ठराव ) नियम १९७५चे पोट कलम3 अन्वये सदर  निर्णय हाेणार आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments