योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाशिबीरांची महत्वाची भूमिका जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे प्रतिपादन

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018

सोलापूर दि. 30 : - शासकीय योजनेत लोकांचा सहभाग वाढवून योजना प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोहोचाव्यात. यासाठी महाशिबीरे महत्वाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भासेले यांनी आज मंद्रूप येथे केले.
मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर), येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाबाबत विधी सेवा व विविध शासकीय योजनांचे महा शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली पाटील, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसिलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी प्रशांत मरोड यांच्यासह मंद्रुप व परिसरातील ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी  उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘ शासकीय योजनात लोकसहभाग वाढल्यास त्यांच्या प्रचार व प्रसाराला गती येईल. प्रत्यक्ष लाभार्थीला योजनेची माहिती अवगत होईल आणि त्या योजनेच्या लाभामुळे त्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्याबरोबरच त्याच्या चेहऱ्यावर समाधान पहावयास मिळेल. शासन जिल्हा परिषदेच्या 14 विभागामार्फत सुमारे 169 योजना राबवित आहे. या योजनांचा लाभार्थीला प्रत्यक्ष लाभ‍ मिळावा, याची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने योजनांची  माहिती पुस्तीका प्रकाशीत करावी’.
गावात स्वच्छतेला प्राधान्य देऊन गाव हागणदारीमुक्त ठेवण्यास अग्रेसर रहावे. सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. जिल्हा कायमपणे हागणदारीमुक्त राहण्यासाठी ग्रामस्थांनी नियमित शौचालयाचा वापर करावा. शोषखड्डे घ्यावेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा निर्माण करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले.
डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात माजी सैनिकांचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहे,  हे प्रश्न सोडविण्यासाठी  विधी सेवा प्राधिकरणाने माजी सैनिकांसाठी  शिबीर आयोजित करावे.
श्री. आणेकर म्हणाले, लोकांना सामाजिक न्याय मिळावा त्यांच्या मुलभूत अधिकाराची जाणीव व्हावी, शासकीय योजनांची माहिती व्हावी, यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत महाशिबीर आयोजित केले आहे. यापुढे प्रत्येक महिन्यात असे शिबीर घेण्यात येणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, गटविकास अधिकारी प्रशांत मरोड, पशुसंवर्धन अधिकारी    डॉ. बबन कांबळे, तालुका कृषी अधिकारी श्री. गावंडे यांनी  विविध योजनांची माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली पाटील यांनी महाशिबीर आयोजनामागील उद्देश प्रास्ताविकात विषद केला.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments