लोटस इंग्लिश स्कुल मध्ये १ फेब्रुवारी रोजी टोपान प्रिंटिग कं. लि. या जापनीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018

विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
पंढरपूर कासेगाव (ता.-पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुलमध्ये उद्या गुरुवार, अर्थात १ फेब्रुवारी रोजी टोपान प्रिंटिग कं. लि.टोकिओ जपान या कंपनीचे अधिकारी शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. अशी माहिती लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी दिली.
          गेल्या नोव्हेंबर महिन्यात टोकिओ जपानच्या टोपान प्रिंटिग कं. लिमिटेडने सामंजस्य करार केला असून येत्या १ फेब्रुवारी रोजी त्यांचे अधिकारी ‘लोटस इंग्लिश स्कूल’मध्ये येवून प्रोजेक्टच्या प्रगतीची पाहणी करणार आहेत, त्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये यारोकी या शैक्षणिक प्लॅटफॉर्मच्या पायलटचा अभ्यास करण्याबद्दलचा सामंजस्य करार केला होता. या पायलट स्टडीचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांची गणित विषयाची मनामध्ये असलेली भिती दूर करण्यासाठी झाली असून सेल्फ लर्निंगद्वारे गणितात गोडी निर्माण झाली आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांनी गणितावर चांगलेच प्रभुत्व मिळविले आहे. या प्रोजेक्टमध्ये शिक्षक वर्गात टॅबद्वारे क्लासवर्क आणि होमवर्क देत आहेत. टॅबवरच प्रत्येक मुलाची प्रगती बघणे आणि त्यानुसार त्याला वैयक्तिक सल्ला देणे शक्य झाले आहेया ‘पायलट स्टडी’ प्रकल्पासाठी टोपान कंपनीने सर्व मुलांना व शिक्षकांना मोफत टॅब आणि यारोकि अॅप्लीकेशन दिले आहे. यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एक्झिटीव्ह जनरल मॅनेजर नावोकी किकुचीव्यवस्थापक कैजीरावो,सुपरवायजर नामिको शिन्होकन्सल्टंट फ्रॉम असेन्चर मसारू होरी आदी असणार आहेत. अधिकाऱ्यांच्या भेटीची तयारी अंतिम टप्यात आली असून या करारातील प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना जपानी पध्दतीने गणित शिकण्याची संधी मिळाली आहे. गणितातील प्रभुत्वामुळेच जपानने आज जगात सर्वच क्षेत्रात अतिशय उल्लेखनिय प्रगती केली आहे. ‘याबददल सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की टोपानने निवडलेल्या शाळांमध्ये मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील लोटस इंग्लिश स्कुल ही एकमेव शाळा आहे. या प्रोजेक्टमुळे मुंबई शहरातील इतर शाळेच्या तुलनेमध्ये विशेषतः ग्रामीण भागात असलेल्या लोटस इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्यांची प्रगती प्रशंसनीय आहे’ असे मत एक्झिटीव्ह जनरल मॅनेजर नावोकी किकुची यांनी व्यक्त केले. भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत संस्थेचे अध्यक्ष बी.डी.रोंगे, संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवर्ग आदी उपस्थित असणार आहेत.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments