अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील भाळवणीमध्ये एकाचे आमरण उपोषण

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील मारूती मंदिरामध्ये प्रजासत्ताक दिनापासून अमरण उपोषणाला सुरूवात झाली असून येथील रहिवाशी गोरख गणपत लिंगे हे अमरण उपोषणाला बसले असून अद्यापपर्यंत त्यांची कोणीही दखल घेतली नाही. याची खंत ग्रामस्थ व्यक्त करताना दिसून येत आहे.

त्यांच्या प्रमुख मागण्या या गावात सुरू असलेले अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत. तसेच नवीन अवैध व्यवसायास परवानगी देवू नये. तसेच गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यांसाठी कायमस्वरूपी औटपोस्ट व्हावे. तसेच अवैध धंदे करणाºयाकडून दहशत थांबवावी. व त्यांचेवर कडक कारवाई करावी तसेच जाणूनबुजून अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करण्यात यावी. दारूबंदीसाठी लढणाºया ग्रामस्थांना व महिलांना सुरक्षा पुरवावी. तसेच दारूबंदीसाठी लढणाºया गावकºयांवर खोट्या केसेस दाखल करू नयेत इत्यादी प्रमुख मागण्या आंदोलन कर्त्यांनी केल्या असून  या सर्व मागण्यांचे निवेदन त्यांनी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी व पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले असून अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही. 

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या भाळवणी गावात शाकंबरी देवीचे व अष्टभुजा मंदिर असून गावातील वातावरण सांप्रदायिक असते. मात्र ग्रामस्थांना तळीरामांकडून नाहक त्रास होत असतो. 
या उपोषणासाठी भाळवणीच्या सरपंच सौ. पुनम गवळी, सांगोल्याच्या नगराध्यक्षा राणी माळी, भाळवणी येथील महात्मा फुले युवक संघटना तसेच गावातील महात्मा फुले गणेशोत्सव तरूण मंडळ, महा. राज्य नाभिक युवक संघटना, सांगोला येथील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संभाजी फाटे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब वाळके, सांगोल्याचे नगरसेवक आनंदा माने इत्यादी मान्यवरांनी यास पाठिंबा दिला असून प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात छेडण्यात येणार असल्याचा इशारा  उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments