लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड :-विहिरी शेजारी एक मेकांबरोबर झालेल्या टकरीत पाय घसरून दोन दुर्मिळ आणि संकटग्रस्त असलेल्या काळवीटांचा मातोरी ता.शिरूर कासार येथे शनिवारी विहिरीत पडून मृत्यू झाला.
मातोरी ता.शिरूर कासार येथील शेतकरी सर्जेराव तुकाराम जरांगे यांच्या शेतातील विहिरीत दोन काळवीट पडून मृत्यू झाल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड व नितीन गायकवाड यांनी सर्पराज्ञीचे संचालक प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे यांना तात्काळ भ्रमणध्वनी दिली. त्यांनतर सिद्धार्थ सोनवणे,सचिन गायकवाड, नितीन गायकवाड, वनरक्षक विजय केदार, शिवाजी आघाव,गोकुळ आघाव, दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीत पडलेल्या दोन्हीं काळवीटास बाहेर काढले. पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय चौरे व डॉ निलेश सानप यांनी त्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते व वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या काळविटावर झापेवाडी येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments