लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018
नाथ चौक तरुण मंडळाच्या वतीन नाथ चौक येथे नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या शुभहस्ते व जेष्ठ कार्यकर्ते शमशुद्दीन सत्तारमेकर यांच्या अध्यक्षतेखाली झेंडावंदन करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाथ चौक मंडळाच्या वतीने नाथ मंदिर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांच्या अध्यक्षतेखाली गट नेते अनिल अंभगराव, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, धनंजय मिसाळ, सुनिल वाळुजकर, संजय जंवजाळ, संजय शहाणे, अॅड.पराग जाहागिरदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अनिल अंभगराव यांनी तिरंगा एकता संमेलन संपुर्ण महाराष्ट्रभर घेण्यात येत असल्याचे सांगुन तिरंगा एकता संमेलनाबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी नाथ चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याना प्रजासत्ताक दिनी रक्तदानाचा संकल्प करुन रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने हा स्तुत्य उपक्रम राबवून राष्ट्रभक्तीची सामाजिक बांधिलीकी जोपासली त्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी आमदार प्रशांतराव परिचारक,गटनेते गुरुदास अभ्यकर,माजी नगराध्यक्ष सतिश मुळे, पांडुरंग घंटी, माजी नगरसेवक सचिन डांगे, यांनीही या रक्तदान शिबिरास भेट देऊन मंडळाच्या कार्यकर्त्याचे कौतुक केले. सदरचे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी नाथ चौक तरुण मंडळाचे अध्यक्ष ओंकार वाळुजकर उपाध्यक्ष माऊली मिसाळ खजिनदार माऊली मैदरगीकर, गणेश जंवजाळ, राहुल अंभगराव, रोहन भेंडे, सागर मिसाळ, सुनिल हिरणवळे, सुरज पंढरपूरकर, राहुल मिसाळ, ऋषिकेश आदापूरे, सिधांत भाळवणकर, ओंकार माने, साहिल आसबे, हेमंत मैदरगीकर,गणेश सांळुखे, दत्ता मिसाळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी श्रीरंग मेटकरी,चंद्रकांत सुपेकर, नागेश अधटराव, उद्धव आसबे, विष्णू मैदर्गीकर हे उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी बजाज रक्तपेढीचे डॉ.आनंद खिस्ते व यांच्या सर्व टिमने सहकार्य केले.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments