बंद असलेले घर फोडले:पावणे तीन लाखांचा ऐवज पळविला :समता काँलनी भागातील प्रकार

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018

निलेश चाळक बीड:- गेल्या एक-दीड महिन्यापासून शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहेत. चोरटे दिवसभर घरांची रेकी करून संधी मिळेल त्यावेळी घरात चोरी करत आहेत. असाच प्रकार काल भर दुपारी समता कॉलनी भागात घडला. घरी कोणी नाही या संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम असा एकूण २ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा ऐवज पळवून नेला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दोन दिवसांपूर्वीच माने कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी चोरी करून घरातील ऐवज लुटून नेला होता. शहरात गेल्या एक-दीड महिन्यापासून घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरटे चोर्‍या करत आहेत. चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिस प्रशासनाला अपयशी आलेले आहे. काल भर दुपारी शहरातील समता कॉलनी, मित्रनगरमध्ये चोरी झाली. सुभाष दगडुबा असवले (वय ५८) यांच्या घरी कोणी नव्हते. याच संधीचा फायदा उचलून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील नगदी ४० हजार व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या चोरी प्रकरणी सुभाष असवले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments