श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये ६९वा प्रजासत्ताक दिन साजरा !

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 27 जानेवारी 2018
करिअर घडविण्यासाठी आपल्या मानसिकतेला योग्य वळण द्या  -सचिव व प्राचार्य  डॉ. बी.पी.रोंगे





पंढरपूरः-‘भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना तुम्ही देखील देशासाठी योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमचे भविष्य उज्वल करत असताना आपल्यापेक्षा आपल्या देशाची मान अधिक उंचावेल अशा सामाजिक कार्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. एकीकडे भारत महासत्ताक बनण्याची स्वप्ने पहात आहेत तर दुसरीकडे आजचा युवकवर्ग सोशल मिडीयात वेळ खर्ची पाडत आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता अधिक भावनिक होवून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही स्पर्धा परीक्षेत म्हणावे तेवढे यश अद्याप मिळात नाही यासाठी युवकांनी आपले कर्तव्ये व जाणीव ओळखून अंगिकारलेल्या कार्यात झोकून दिले पाहिजे. आपला सर्वात मोठा शत्रू असलेले  आपले मन व भावनिकता ही बाब आपल्या करिअरच्या दृष्टीने घातक आहे. यासाठी प्रथम आपण करीयर घडविताना या गोष्टींना प्राधान्य देवू नका व मनाला भक्कम वळण देवून आपल्या यशाचा वारू चोफेर उधळेल अशी वाटचाल करा.‘ असे मत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी व्यक्त केले.
            येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत होते. यावेळी विशाल भोसले, अजय भोसले व सौरभ तांबे या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमके काय हे सांगून भारतातील वास्तवतेवर परखडपणे विचार मांडले. यावेळी ‘राष्ट्रीय मतदान दिवस’ निमित्त आयोजिलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम-सुमित पटवारी, द्वितीय-सिमरन मुजावर, तृतीय-प्रसाद सौदागर, रांगोळी स्पर्धेत प्रथम-श्रीलेखा खेडकर, द्वितीय-शिवश्री गोंजारी, तृतीय-पूजा घाडगे, डीबेट प्ले मध्ये प्रथम-रोहित कांबळे, द्वितीय-करण बनसोडे, तृतीय-महादेव डोळे, स्ट्रीट प्ले मध्ये प्रथम-रोहित कांबळे ग्रुप, द्वितीय -अश्विनी देशमुख ग्रुप, तृतीय-ज्ञानराज तेलंग ग्रुप तसेच सहस्त्र मतदार म्हणून राजश्री गायकवाड व भाग्यश्री मुंडे यांचा देखील  प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. राम काळे व त्यांच्या मित्रांनी ढोलकी व तबल्याच्या साह्याने ‘झंडा उंचा रहे हमारा...’ या सुमधुर गीताने वातावरण देशभक्तीमय झाले. पुढे बोलताना सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांनी आपण ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा का करतो? हे सांगून आपलं मन हे बहिणाबाई चौधरी यांच्या मन वढायं वढायं…’ प्रमाणे असते त्यासाठी मनावर आवर घालून स्वतः निर्णय घ्या आणि त्या दिशेने झेप घ्या. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत’ आता युवकांच्या कणखर कार्यावर अवलंबून आहे’ असे सांगून ‘युवकांची भूमिका नेमकी काय असावी?’ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी अविष्कार संशोधन  स्पर्धेत यश मिळविण्यासाठी केलेल्या परिश्रमाची कहाणी ऐकविली. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील विभागांचे स्वतंत्ररित्या बुलेटीनचे प्रकाशन व स्पिरीट २ के १८ या राष्ट्रीय परिषदेच्या पोष्टरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.आर. जी. कुलकर्णी, डिप्लोमा पॉलिटेक्नीकलचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, वसतिगृह व्यवस्थापक प्रा.एम.एम.पवार, रजिस्ट्रार राजेद्र झरकरसांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्रा.यशपाल खेडकरप्रा. एस.डी.भिंगारे, मधुकर मोरे, अधिष्ठाता,विभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांच्यासह संस्थेअंतर्गत असणार्‍याअभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवीकापदवी व पदवीत्तर पदवी तसेच  एम.बी.ए.चे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. सुत्रसंचालन बालाजी सुरवसे, प्रतीक्षा साळुंखे व स्वप्ना सावंत या विद्यार्थ्यांनी  केले.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments