दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात कलम 37 (3) लागू

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2018

     सोलापूर  दि. 14 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात दिनांक     21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 या कालावधीत  बारावी आणि दिनांक 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 या कालावधीत  इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे.
      इयत्ता बारावी व दहावी परीक्षा कालावधीत सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या परीक्षा केंद्र परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (3) अन्वये बंदी आदेश लागू केले आहेत.
      फेब्रुवारी / मार्च 2018 च्या दहावी व बारावी परीक्षा केंद्राचे ठिकाणी व परीक्षक केंद्र व प्रश्नपत्रिका वितरण प्रमुख केंद्राचे ठिकाणी बाहेरील इसमांकडून परीक्षा केंद्राचे आवारात बेकायदेशीर जमाव करून कॉपी करण्यास मदत करणे व परीक्षा पर्यवेक्षकांना दमदाटी करणे व प्रसंगी मारहाण करणे, प्रश्नपत्रिका वउत्तरपत्रिका पळविणे वगैरे गैरप्रकारामुळे परीक्षा केंद्राचे ठिकाणी शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिनांक 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 या कालावधीत होणाऱ्या  बारावी आणि दिनांक 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 या कालावधीत होणाऱ्या दहावी  परीक्षा केंद्रच्या 200 मीटर परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.
      या आदेशानुसार परीक्षा केंद्रातील 200 मीटर परिसरात सकाळी 9.00 ते सायं. 18.00 वा. पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पाच किंवा पाचाहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थीनींना व त्यांना सोडण्यास येणाऱ्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परीक्षक, सुपरवायझर, शिपाई तसेच शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्ती  इ. अनुषंगिक व्यक्तींना लागू पडणार नाही.असे अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments