लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2018
पंढरपूर,- राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात दावे यांचे एकूण 288 प्रकरणे तसेच दाखल पुर्व 52 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 62 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून, याप्रकरणामध्ये एकूण 8लाख 89 हजार 865 रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष् तथा जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांनी दिली.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष् तथा जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 10 फेब्रवारी 2018 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीसाठी एकूण तीन पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनल मध्ये जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख, दिवाणी न्यायाधिश आर.व्ही.बुराडे, सह. दिवाणी न्यायाधिश एस.टी.शिंदे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पोलीसांनी दाखल केलेल्या मोटार अपघात नुकसान भरपाई मागणी मध्ये प्रथमच तडजोड झाल्याने भविष्यात दाखल होणारी प्रकरणे दाखल होणार नाहीत. पोटगीसाठी साठी दाखल झालेल्या प्रलंबित दाव्यामध्ये एकरकमी 6 लाख रुपयांमध्ये आपसात तडजोड करण्यात आली.तसेच 35 वर्षे प्रलंबित असलेले प्रकरण आपसात 78 हजार रुपयांवर तडजोडीवर मिटवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांनी दिली
यावेळी जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विधिज्ञ मनाली बनसोडे, मोहिनी कुलकर्णी, ए.एन.जाधव, एस.व्ही.पाटील, एस.एस.व्यवहारे, श्री.अपशिंगेकर तसेच न्यायालखीन कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments