डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची देखील भरारी सातासमुद्रापार

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2018

शिवराम सुरवसे यांची निवड लंडनच्या झेन्सार टेक्नोलॉजी कंपनीत
पंढरपूर- स्वेरीमधील फक्त पदवी अभियांत्रिकीचेच विद्यार्थी सातासमुद्रापार जाताहेत हेच आतापर्यंत सर्वश्रुत होते परंतु पदविका अर्थात डिप्लोमा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील स्वेरी पदवीच्या पावलांवर पाऊल टाकत देश- विदेशात जाताहेत ही बाब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अधोरेखीत करण्यासारखीच आहे.
           कौटुंबिक पार्श्वभूमी जेमतेम, त्यातून अत्यंत परिश्रमाने सुरेश व सौ.रंजना या सुरवसे दाम्पत्यांनी वडदेगाव (ता. मोहोळ, जि- सोलापूर) मध्ये शेती करून आपल्या मंगेश, शिवराम व रामलिंग या तिन्ही मुलांना अभियंता बनविले. त्यापकी एक मंगेश हा स्वेरीत प्राध्यापकाची भूमिका निभावतोय तर डिप्लोमा अभियांत्रिकीच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी शिवराम सुरेश सुरवसे हा दुसरा असून तो स्वेरीअंतर्गत डिप्लोमामधून कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग विभागातून सन २०१०-११ उत्तीर्ण झाला. अथक परिश्रम व त्याला उच्चशिक्षित प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन आणि संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांनी सुरवातीलाच दिलेली ‘अचूक दिशा’ यामुळे त्यांने मोठी स्वप्ने पहिली आणि पूर्णत्वास नेली. त्यानंतर पदवीचे शिक्षण त्याने पुण्यात घेतल्यानंतर आपल्या कलागुणांचा विकास करत तो झेन्सार टेक्नोलॉजी कंपनीत कॅम्पस मधून रुजू झाला. त्यानंतर त्याचे काम आणि अथक मेहनत पाहून त्याला वरिष्ठांनी बढती देण्याचे ठरविले. त्याला थेट आपल्याच कंपनीत वरिष्ठ स्तरावर व पदावर पाठविले. लंडन मधील १०० ब्रुक ड्राईव, ग्रीन पार्क बर्क शायर लगत असलेल्या झेन्सार टेक्नोलॉजीच्या मुख्य कंपनीत त्याची नियुक्ती केली. आता तो त्याठिकाणी नुकताच रवाना झाला. जाण्यापूर्वी ‘ज्यामुळे आपण आपल्या पायावर उभे राहिलो त्याची जाणीव म्हणून तो स्वेरी कॅम्पसमध्ये आला. त्यावेळी त्याचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ व त्यांचे विभाग प्रमुख प्रा. अवधूत भिसे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी भावूक होवून तो म्हणाला ‘संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. रोंगे सरांनी घालून दिलेल्या प्रचंड परिश्रमाच्या बळावर मी आज सातासमुद्रापार जात आहे. आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वेरीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.’ असे त्याने सांगितले. केवळ ‘हार्ड वर्क’ आणि मार्गदर्शनाची ‘अचूक दिशा’ यामुळे मी यशस्वी झालो. अशी कबुली देखील शिवरामने दिली. शिवराम याची सुरवातीला सोलापुरातील शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता परंतु स्वेरीतील आदरयुक्त शिस्त, संस्कार आणि अभ्यासाची पद्धत यामुळे त्याने स्वेरीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. एकूणच स्वेरीतील संस्कार कामी आल्यामुळे त्याचा परिवार आनंदी आहे. यावेळी प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, विभागप्रमुख प्रा. अवधूत भिसे, प्रा. मंगेश सुरवसे यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. 

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments