पंढरीतल्या रिक्षावाल्याचा प्रामाणिकपणा...रोख रक्कम व अनेक मोबाईल हॅन्डसेट्सची प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग केली परत!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 10 फेब्रुवारी 2018

पंढरीतील एका रिक्षाचालकाने स्वत:च्या रिक्षात रोख रक्कमेसह अनेक मोबाईल व महत्वाची कागदपत्रे असणारी बॅग पंढरपूर शहर पोलिसांच्या स्वाधिन करुन आपल्या प्रामाणिकपणाची ओळख अवघ्या महाराष्ट्राला करुन दिलीय!

याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्याकडून समजलेल्या माहितीनुसार आज दि. 10 फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेश येथील विठ्ठलभक्त छबिलाल पारधी हे त्यांचे कुटूंबासह पंढरीत देवदर्शनासाठी आले होते. त्यांनी एका रिक्षात महाद्वार पर्यंत प्रवास केला. यावेळी घाईघाईने या रिक्षामध्ये ते आपली बॅग विसरले. त्यांची बॅग आपल्या रिक्षामध्ये असल्याचे रिक्षाचालक प्रविण मुरलीधर ननवरे (वय-35), रा. भंडीशेगांव, ता. पंढरपूर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ ही बॅग पंढरपूर शहर पोलिस ठाणेत जावून जमा केली. 

बॅग मिळाल्यानंतर पंढरपूर शहर पोलिस ठाण्याकडून सदर प्रवाशाशी संपर्क साधण्यात आला व त्यांन पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडे सदरची बॅग त्यांचीच असल्याची खात्री करुन सुपूर्त केली. या बॅगेत चार मोबाईल, महत्वाची कागदपत्रे, बँकेचे एटीएम व रोख रक्कम होती. यावेळी रिक्षाचालक प्रविण मुरलीधर ननवरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विठ्ठल दबडे, सहा. पोलिस निरिक्षक बुवा यांनी व सदर प्रवाशी व त्यांच्या कुटूंबाने कौतुक केले.


संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments