लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 10 फेब्रुवारी 2018
पंढरपूर: ‘अपयश, कर्जबाजारीपणा, नैराश्य, बेरोजगारी यामुळे जीवनात अनेक
संकटे येतात ती आत्महात्येने दूर होत नाहीत तर त्या संकटात वाढ होते.
जीवनातील आव्हाने स्वीकारून हसत-हसत संकटाना तोंड दिले पाहिजे. आजचा
माणूस ताणतणावात जीवन जगतो. त्यामुळे माणूस हसणे विसरला आहे.
हसल्यामुळे तणावमुक्त जीवन जगता येते. शरीर, मन, बुद्धी तंदुरुस्त राहते.
हसण्यानेच माणूस सुंदर दिसतो. जीवन जगण्याचे एकमेव टॉनिक म्हणजे विनोद.
हासण्यासाठी जीवन असते प्रत्येकाने हासतच जीवन जगले पाहिजे.’ असे प्रतिपादन
पुणे येथील ‘हास्यनगरी’, सुप्रसिध्द एकपात्री कलावंत मा. महेंद्र गणपुले यांनी केले.
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून
मा. महेंद्र गणपुले बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम
गोसावी होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य सीताराम गोसावी, स्थानिक
व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष सोनावणे, मा. बाळासाहेब पाटील (वरवडे), बाळासाहेब पाटील (रोपळे ) जिमखाना विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन सोहनी, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य
विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. जे.
एस. पाटील डॉ. विकास कदम, विद्यापीठ प्रतिनिधी खंडू कोल्हे, सौ. सीमा
गोसावी, सौ. गणपुले, डॉ. राजेंद्र जाधव, मुख्याध्यापक निकम, प्रा. विठ्ठल फुले
, मनोज खपाले, कार्यालयीन प्रमुख बी. व्ही. होवाळ आदी मान्यवर
उपस्थित होते.
महेंद्र गणपुले यांनी कार्यक्रमात हास्यनगरी व एकपात्री
सदरीकरणातून विविध वाद्याचे आवाज कडून सर्वांना हसविले. स्वागत,
प्रास्ताविक व पाहुण्यानांचा परिचय डॉ. विकास कदम यांनी करून दिला.
कार्यक्रमाची सुरवात सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत
गीताने झाली. यावेळी मा. महेंद्र गणपुले यांनी जिमखाना अहवालाचे वाचन केले.
तर डॉ. पी. पी. उबाळे यांनी गुणवंत शिक्षक सत्काराचे वाचन केले. मान्यवरांच्या
हस्ते महाविद्यालयातील आविष्कार, व्हेन्चर, आर्थिक जगत, अर्थमंच, युरेका,
जिमखाना विशेषांक, या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या आनंद
सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, सेवक यांचा सत्कार
करण्यात आला. पंढरपूर परिसरातील नागरिक, शिक्षक, सेवक, विद्यार्थी, पालक,
रयतप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे, प्रा. आर. एस. पवार
यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आभार विद्यापीठ प्रतिनिधी श्री. खंडू कोल्हे मानले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments