लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 10 फेब्रुवारी 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- माघी वारीनंतर अस्वच्छ झालेल्या चंद्रभागेच्या पैलतिरावरील 65 एकर परिसराची स्वच्छता पंढरपूर तालुका कोळी महासंघाच्या वतीने करण्यात आली. अशी माहिती कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मोहन सावतराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
माघी वारीनंतर चंद्रभागेच्या पैलतिरावरील 65 एकर परिसरात प्लास्टीक पिशव्या, पत्रावळ्या, शिळे अन्न, प्लास्टीकच्या पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, केळीच्या-फळांच्या साली व अन्य केरकचरा इस्तत: पसरलेला होता. अनेक ठिकाणी उघड्यावर पसरलेल्या या कचर्यामुळे पहाटे या परिसरात फिरावयास येणार्या नागरिकांना नाक मुठीत धरुनच आपली प्रभातफेरी पार करावी लागत असे. याचबरोबर या परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे या भागात वास्तव्यास असणार्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब कोळी महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही या भागात जावून या परिसराची संपुर्ण स्वच्छता केली. जाळण्यासारखा सुका कचरा जाळला व जमा झालेला सर्व ओला कचरा 65 एकर परिसराच्या बाहेर काढून ट्रॅक्टरमधून त्याची विल्हेवाट लावली. मुळात वारकरी बांधवांनी दिसेल तेथे कचरा व शिळे अन्न वगैरे फेकून देणं चुकीचं आहे. परिसरातील कचरा कुंड्यांमध्ये कचरा टाकणं अपेक्षीत असताना वारकरी बांधवांनी असा वाट्टेल तिथं कचरा टाकणं म्हणजे बेशिस्तपणाच म्हणावा लागेल. यासाठी वारकर्यांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे. येणार्या वारीकाळात याबाबत पंढरपूर तालुका कोळी महासंघाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातील. असे मत यावेळी कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव यांनी व्यक्त केले.
या स्वच्छता मोहिमेमध्ये कोळी महासंघाचे सोमनाथ नेहतराव, अक्षय अधटराव, राहुल अधटराव, सतीश पाडुळे, मिथुन अधटराव, आण्णा अटकळे, राहुल अधटराव, बाळासाहेब सावतराव, अनिल शिंदे, मुन्ना नेहतराव, आण्णा मोरे, गौरव कोताळकर, विशाल नेहतराव, विजय सावतराव, मुन्ना कोताळकर, लखन सावतराव, मिलींद जगताप, नितीन लोंढे, हणुमंत मोरे, प्रसाद अधटराव, रविंद्र अधटराव, अमोल रोंगे, विशाल नेहतराव, ॠषीकेश शिंदे, अंकुश टोमके, देविदास टोमके, राजु मोरे, आशुतोष शिंदे, अजय सावतराव, सुमीतभैया सावतराव, शुभम अधटराव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments