लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जवाहर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा श्री जगमित्र नागा शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीधरराव गित्ते पाटील यांचे आज रविवार दि.04 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वा वृध्दापकाळाने
राहात्या घरी निधन झाले. मृत्यू समयी ते 87 वर्षोचे होते.आज दुपारी त्यांच्यावर टाळ, मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली व अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीधरराव गंगाराम गित्ते रा.वाघबेट, ता.परळी वैजनाथ जि.बीड, ह.मु.बँक काँलनी परळी वैजनाथ यांचे आज रविवारी निधन झाले.जुन्या पिढीतील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी, बँरिस्टर अँड.ए.आर.अंतुले यांच्या सोबत त्यांनी काम केले आहे. श्री जगमित्र नागा शिक्षण संस्थेचे तथा जवाहर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष,अंबाजोगाई पंचायत समितीचे उपसभापती व श्री जगमिञ मंदिराचे वि्श्वस्थ पद ही त्यांनी भुषविले आहे. या काळात त्यांनी
विविध शैक्षणीक सुधारणा व वैद्यनाथ महाविद्यालयात त्यांनी अनेक आधुनिक तंञज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थी पालक व शिक्षकामध्ये व परळी शहर व तालुक्यात ते सर्व परिचित होते. परळी वैजनाथ व अंबाजोगाई तालुक्यातील विविध विकास कामे त्यांनी केले. बीड लोकसभा निवडणुक लढविली होती त्यामुळे ते देशभरात चर्चेत आले होते.
कै.श्रीधरराव गंगाराम गित्ते पाटील हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने परळी व अंबाजोगाई तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रीधरराव गित्ते पाटील यांच्या पाश्चात्य पत्नी,तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
कै.श्रीधरराव गंगाराम गित्ते यांच्या पार्थिवावर परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या या अंतयात्रेत सर्व स्तरातील नागरिक डॉक्टर, व्यापारी, पत्रकार, वकील, पोलीस कर्मचारी व नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित होते. कै.श्रीधरराव गित्ते यांच्यावर कोसळलेल्या दुःखात ------------परिवार सहभागी आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments