लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018
दुबईत सादर करणार संशोधन पेपर
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे. व संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांचा दुबई येथे अभ्यास दौरा असून ते डोई. २ फेब्रुवारी रोजी दुबईकडे रवाना झाले. ‘इनोव्हेशन अँन्ड अप्लाईड रिसर्च कमिटी’ यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. यासाठी स्वेरीच्या डॉ. रोंगे आणि डॉ पवार या संशोधकाना आमंत्रित केले असून दुबई मधील ‘दुबई मेन्स कॅम्पस, हाय्यर कॉलेज ऑफ टेक्नोलॉजीमध्ये एव्हीटेशन अँन्ड स्पेस टेक्नोलॉजी या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे आणि अधिष्ठाता डॉ. पवार हे आपले ‘एक्स्परीमेंटल एनालिसीस ऑफ कंम्पोजिट रोटर ब्लेड मॉडेल्स फॉर डॅमेज आयडेंटी फिकेशन’ या विषयावर संशोधन पेपर सादर करणार आहेत. त्यासाठी दोघेही नुकतेच दुबईकडे रवाना झाले आहेत. यापूर्वी दोघांचेही परदेशात अभ्यास दौरे झाले असून सिंगापूर, दक्षिण कोरिया व युरोप या ठकाणी संशोधन पेपर्स व आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ते उपस्थित राहून संशोधनावर शोध पेपर्स सादर केले आहेत. या परिषदेमुळे संशोधनातील नवनवीन माहितीची देवाण घेवाण होवून त्याचा फायदा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी स्वेरी परिवारातील अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकांनी सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे आणि अधिष्ठाता डॉ. पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments