पंढरपूर-पुणेरोडवर धनश्री हाॅटेल समोर अपघात... सोलापूरमधील तरूण जागीच ठार!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018
पंढरपूर-पुणेरोडवर धनश्री हाॅटेल समोर अपघात... सोलापूरमधील तरूण जागीच ठार!

पंढरपूर -पुणेरोडवर धनश्री हाॅटेलसमोर आज सकाळी झालेल्या अपघातात सोलापूर येथील एक तरूण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वरील ठिकाणी क.भा.पा. महाविद्यालयाकडून भरधाव वेगात आलेला मोटारसायकलस्वार रविशंकर चंद्रकांत जिगजळी (वय-25), रा. तळेहिप्परगा, सोलापूर हा त्याच्या समोरील ट्रक ला ओव्हरटेक करत असतानाच धनश्री हाॅटेल मधून एक क्रेटा गाडी बाहेर येत होती. यावेळी झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जिगजळी हा जागीच ठार झाला.

अपघात झाल्याचे समजताच शहर वाहतुक शाखेचे एपीआय चव्हाण हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू आहे. हा अपघात कसा झाला याबाबतचा अधिक तपास सुरू असून या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती एपीआय चव्हाण यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना दिली.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments