द्राक्ष बागेवरची पाखरे हाकलली नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला दगड मारल्याने पत्नीचा जागीच मृत्यू... पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील घटना

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 5 फेब्रुवारी 2018
द्राक्ष बागेवरची पाखरे हाकलली नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला दगड मारल्याने पत्नीचा जागीच मृत्यू...
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील घटना

द्राक्षाच्या बागेवरची पाखरं का हाकत नाही?  असं म्हणत रागाच्या भरात पतीने पत्नीला दगड मारल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे घडली आहे. याबाबत अमृत गेना पवार, रा. आरळी, ता. मंगळवेढा यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, आज दि.5 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फुगारे वस्ती, कासेगाव ता.पंढरपूर येथे आरोपी मोहन सुभाष फुगारे (45) याने आपली पत्नी सौ.सुरेखा मोहन फुगारे (40) ही शेतातील गवत काढत असताना तिला "द्राक्ष बागेतील पाखरे का हाकलत नाही?" अशी विचारणा करत रागाच्या भरात दगड फेकून मारला. हा दगड सुरेखा फुगारे यांच्या डोक्याला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सदर आरोपीविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर शिंदे हे करत आहेत.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments