लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 5 फेब्रुवारी 2018
पैशाच्या व्यवहारातून बोहाळी येथील एकाचे हातपाय मोडले... रिव्हॉल्व्हर नेम धरून जीवे मारण्याचा प्रयत्न..!
पंढरीतील इसबावी व वाखरीच्या पालखी तळावरची घटना..!
पैशाच्या व्यवहारातून बोहाळी येथील एकाचे हातपाय मोडले, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा जबाब या घटनेतील जखमी फिर्यादीने पंढरपूर शहर पोलिसांना दिला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार फिर्यादी नारायण शिवाजी घोडके, रा. बोहाळी, ता. पंढरपूर यांना दि.4 फेब्रुवारी रोजी 12:30 ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास विठ्ठल तालीम इसबावी व वाखरी येथील पालखी तळावर मारहाण झाली.
आरोपी आप्पा उर्फ बापु शिवाजी गोडसे, तात्या उर्फ सुहास शिवाजी गोडसे, सुभाष तानाजी गोडसे, रणजीत संतोष गोडसे, आप्पा (पुर्ण नाव माहित नाही), सराव रा. कौठाळी, ता. पंढरपूर यांनी फिर्यादीस पैशाच्या व्यवहारातून लोखंडी पाईप, लाकडी स्टीक, लहान मोठया दगडांनी मारहाण करून त्यांचे हातपाय मोडले व रिव्हॉल्व्हर व गावठी कट्टा फिर्यादीच्या दिशेने नेम धरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ व दमदाटी केली. असा जवाब सोलापूर येथील अश्विनी हाॅस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या फिर्यादीने पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोसई गभोले यांचेकडे दिला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि बुवा हे करत आहेत.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments