कासाळ ओढ्यात वाळू चोरांचा धुमाकूळ

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018


। पंढरपूर , प्रतिनिधी
सांगोल तालुक्यातून उगम पावलेल्या कासाळ ओढ्याचा शेवट पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे भिमा नदीत होतो. तालुक्यातील 9 गावांमधून गेलेल्या ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा आहे. या वाळू साठ्यावर गेल्या काही दिवसांपासून सुपली व पळशी परिसरात डल्ला मारला जात आहे. वाळू चोरांना आवर घालण्यात प्रशासनाला उपयश येत असल्याने ग्रामस्थांमधून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. 
तालुक्यातील 9 गावांमधून जाणार्‍या कासाळ ओढ्यामध्ये टाटा कंपनीच्यावतीने खोलीकरण व रूंदी करणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित 9 गावांमध्ये महसूल प्रशासनाच्यावतीने तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी ग्रामस्थांच्या बैठका घेऊन ग्रामसभा घेतल्या. टाटा कंपनीचे काम सुरू होण्याअगोदर उपरी ता. पंढरपूर येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ओढ्यात खोलीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू केले. सुरूवातील दोन ते तीन दिवस काम वेगाने चालले परंतू ओढ्यामध्ये अतिक्रमण केलेल्या शेतकर्‍यांनी कामास विरोध केल्याने सध्या मंद गतीने काम सुरू आहे. ओढ्यातील अतिक्रमण काढण्यासाठी तहसिल प्रशासनाच्यावतीने भूमिअभिलेख विभागास ओढ्याची मोजनी करण्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. उपरी येथे कासाळ ओढ्यातून ग्रामस्थांनी माती वाहून नेण्यास सुरवात केली असता सुपली व पळशी भागात मात्र काही जणांनी ओढ्यातील वाळूवर डल्ला मारण्यास सुरूवात केली. त्यामुळे उपरी ग्रामस्थांनी जाऊन वाळू चोरी थांबवली परंतू वाळू चोरांवर महसूल प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्याने वाळुचोरी अदयापही सुरूच आहे. आम्हाला महसुल प्रशासनातील अधिकार्‍यांनीच वाळू काढण्याचे सांगितले असल्याने आम्ही येथून वाळू नेत आहोत अशी उत्तरे वाळूचोरांकडून देत मोठ्या प्रमाणात ओढ्यातील वाळूंवर डल्ला मारला जात आहे. यामुळे कासाळ ओढ्यातील वाळूची चर्चा संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्यात पसरली असून अनेक वाळू चोर आपली मोठी मोठी वाहणे घेऊन ओढ्यामध्ये वाळू काढण्यासाठी येत आहेत. त्यामुळे कासाळ ओढ्याचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम नक्की होणार का? मोकाट वाळू चोरांना प्रशासन धडक कारवाई करणार का असे अनेक सवाल उपस्थित होत आहे. कारण वाळू चोरीमध्ये अनेक प्रतिष्ठीत नागरीक गुंतल्याचे पहावयास मिळत आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments