लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018
* १३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र *
परळी वैजनाथ /महादेव गित्ते. .......
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची महाशिवरात्र यात्रा भरते. या यात्रेनिमित्त देशभरातील विविध भागातून लाखो भाविक परळीत दाखल होतात. या महाशिवरात्र यात्रेची पूर्वतयारी वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. या निमित्ताने मंदिर व परिसरात रंगरंगोटी, दर्शन व्यवस्था आदी विविध कामे सध्या वेगाने सुरू आहेत.
वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने महाशिवरात्र उत्सवाची तयारी सुरु करण्यात येत आहे.यावर्षी मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे. त्यानिमित्ताने देवल कमिटीच्या वतीने पारंपरिक तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. या मध्ये पालखी सोहळा असतो. महाशिवरात्र पर्वकाळात दर्शनासाठी देशभरातील विविध ठिकाणचे भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. महाशिवरात्र यात्रा पार्श्वभूमीवर मंदिर व परीसरात विविध कामे सुरू आहेत. या मध्ये रंगरंगोटी करण्यात येत आहे. तसेच दर्शन मंडप, दर्शन मार्ग, सुरक्षाव्यवस्था आदी दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. दर्शन रांगांसाठी उत्तर प्रवेश द्वारासमोरील पायर्या वर दर्शन रांगांसाठी बॅरिकेट्स टाकण्याचे काम सुरू आहे.
महाशिवरात्र यात्रा पार्श्वभूमीवर दर्शन रांगांसाठी उत्तर प्रवेश द्वारासमोरील पायर्या वर दर्शन रांगांसाठी बॅरिकेट्स टाकण्याचे काम सुरू आहे.
महाशिवरात्र यात्रा पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विविध मंदिरे, वास्तु या ठिकाणी रंगरंगोटीची कामे सुरू आहेत.
दरवर्षी लाखो भाविक मंदिरात येतात. या पार्श्वभूमीवर देवल कमिटीकडून भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, मंदिर प्रशासनाकडून मंदिरात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, रंगरंगोटी आदी कामे सध्या सुरू आहेत. भाविकांच्या सोयी सुविधा साठी देवल कमिटी प्रयत्न करीत आहे.
- राजेश देशमुख
सचिव, वैद्यनाथ देवल कमिटी,
परळी वैजनाथ,.
- राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या ताब्यात परळीची नगर परिषद आहे. नगर परिषदेमार्फत दरवर्षी यात्रा महोत्सव भरवला जातो. गेल्या कांही वर्षांपासून परळीतील महाशिवरात्री यात्रा कमी झाली होती. ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आपल्या कारकीर्दीत मरगळलेल्या यात्रेचे पुनरुज्जीवन करून भव्य दिव्य यात्रा भरवली. त्यामुळे पुन्हा परळीत मोठी यात्रा भरायला सुरूवात झाली. नगर परिषदेच्या वतीने या यात्रेचे व्यवस्थापन केले जाते. तसेच विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.यावर्षी ही त्याचप्रमाणात यात्रा भरेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. नगर परिषदेकडून ही या यात्रेची तयारी सुरू आहे. यात्रा भरवणे व कुस्ती स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी आयोजित करण्याबाबत तयारी सुरू आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com








0 Comments