लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018
पंढरपूर, दि. 06 :- शासनाच्या विधी व न्याय विभाग आणि उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या संमतीने 14 व्या वित्त आयोगातंर्गत पंढरपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांनी दिली.
न्यायालयात दाखल होणारे फौजदारी खटले तातडीने निकाली काढण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली असून, हे खटले चालविण्यासाठी श्री. निनाजी मोरे यांची अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या न्यायालयाचे कामकाज दिनांक 5 फेब्रुवारी 2018 पासून सुरु झाले असल्याचेही जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांनी सांगितले. यावेळी पंढरपूर तालुका विधीज्ञ संघाचे अध्यक्ष श्री. शहानुरकर, विधिज्ञ, न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments