शाळा परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : गृहराज्यमंत्री पाटील

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 फेब्रुवारी 2018


सोलापूर  दि. 8 :-  शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा यांची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करा अशा सूचना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज येथे दिल्या.
गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पोलीस आयुक्तालय येथे आढावा बैठक झाली. त्या बैठकीत श्री. पाटील यांनी या सूचना दिल्या. पोलीस आयुक्तालय येथे झालेल्या या बैठकीवेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त नामदेव चव्हाण, अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी आयुक्त तांबडे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या अनुषंगाने सादरीकरण केले. त्यानंतर श्री. पाटील यांनी सांगितले  की, महिला, मुले, मुली यांच्या संरक्षणाबाबत विशेष दक्षता घेतली जावी. सायबर क्राईमचे आव्हान दिवसें दिवस वाढत आहे. या प्रकारचे गुन्हे तपास गतीने व्हावा यासाठी आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. त्याचा गुन्ह्याची उकल हाण्यासाठी प्रभावीरित्या वापर केला जावा.
श्री. पाटील यांनी सांगितले की, पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेल्या नागरिकांना कमीत कमी वेळात आपली फिर्याद नोंदवता यावी यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक केली जावी.
गुन्हे सिध्दता वाढण्यासाठी विशेष वकिलांची नियुक्ती केली जावी यासाठी प्रस्ताव पाठवले जावेत. त्यामुळे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न होतील. जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि लोकसहभागातून शहराच्या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत. यामुळे व्हिजीबल पोलिसिंग वाढेल आणि गुन्हेगारीला आळा बसवणे शक्य होईल.
यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वैभव माळी यांनी पदक प्रदान करण्यात आले. सदर बझार पोलीस स्टेशनला आयएसओ मानांकन मिळाले आहे. हे मानांकनाचे प्रमाणपत्र पोलीस निरीक्षक एन.जी. अंकुशकर यांना प्रदान करण्यात आले. यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते आधुनिकीकरण करण्यात आलेल्या लेखा शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
श्री. पाटील यांनी आयुक्तलयामार्फत विकसित करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची आणि सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी केली. सहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घाटगे- वालावलकर यांनी विविध माहितीचे सादरीकरण केले.

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments