शालार्थ प्रणालीत अडकले शिक्षकांचे वेतन...संकेतस्थळ बंद! जबाबदार कोण? शिक्षण विभागाचा घोळ कायम!!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 23 फेब्रुवारी 2018

सांगोला/प्रतिनिधी : संपूर्ण भारतात ऑनलाईन कारभार होत असताना महाराष्ट्रामध्ये ऑनलाईनचे वारे असताना त्याला शिक्षणखाते तर कसा अपवाद राहील? गेल्या 3 ते 4 वर्षापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाने कर्मचाऱ्यांकरिता शालार्थ वेतन प्रणालीचे सॉफ्टवेअर करुन त्यामार्फत जानेवारी 2018 पर्यंत वेतन अदा करण्याचे काम केले.
पण गेल्या दोन महिन्यांपासून शालार्थ बंद पडली आहे. राज्यभरात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार ऑनलाईन प्रणालीमार्फत होऊ शकणार नाहीत. याची जाणीव शिक्षण विभागाला असूनही गेल्या चार महिन्याचा पगार ऑफलाईन पध्दतीने देण्याचा कोणताही आदेश आलेला नाही. दरमहाच्या सात तारखेपर्यंत पगार बीले वेतन पथकाकडे जायला हवी होती. अद्यापही आदेश नसल्यामुळे पगार बीले वेतन पथकाकडे जमा होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे राज्यातील 3.50 लाख तर अनुदानित शिक्षण संस्थामधील 2 लाख शिक्षकांचे पगार गेले चार महिने वेतन वितरणाचे सॉफ्टवेअर करफ्ट झाल्याने होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे शिक्षक हवालदिल झालेले आहेत. शहरी भागातील गृहकर्जाचे हप्ते, तसेच इन्कम टॅक्सचा भरणाही वेळेवर होऊ न शकल्याने शिक्षकांना मोठा फटका बसला आहे. 
शालार्थ प्रणाली पूर्ववत होईपर्यंत राज्यातील शिक्षक, शिक्षकेत्तरांचे पगार ऑफलाईन काढण्याबाबत आदेश काढावा अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे. 
या संदर्भात शिक्षण वेतन विभाग, सोलापूर यांच्याकडे माहिती विचारली असता त्यांनी अद्याप याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे सांगून हात झटकले. शालार्थ वेतन प्रणालीचा फटका संबंधित कर्मचारी यांचे सोसायटीवर दंडव्याज व आयकर विभागाची कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. याचा आर्थिक त्रास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना बसत आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments