इमारत बांधकाम कामगारांसाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजना

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 23 फेब्रुवारी 2018

महाराष्ट्रातील 25 लाख इमारत बांधकाम नोंदणीचे लक्ष्य
कामगार विभागाने पूर्ण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
मुंबई दि. 23 :  महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत25 लाख कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य कामगार विभागाने पूर्ण करावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
वर्षा निवासस्थानी आज विशेष नोंदणी अभियानाचा ई शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकरसामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले तसेचवेबकास्टदवारे नागपूरहून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  अमरावतीहून पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील या अभियानात जोडले गेले होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणालेइमारत बांधकाम कामगार उंच उंच इमारती तयार करण्यात आपला महत्वाचा सहभाग देतात. पण त्यांचे जीवन नेहमीच दुर्लक्षित राहते. आज जाहीर करण्यात आलेली अटल विश्वकर्मा सन्मान योजना महाराष्ट्रातल्या 25 लाख कामगारांपर्यंत पोहोचणार आहे.या अभियानाअंतर्गत जाहीर करण्यात आलेलया 28योजनांचा फायदा अधिकाधिक कामगारांनी घ्यावा असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी योवळी केले.
पूर्वीच्या काळी माणसांच्या रोटीकपडा और मकान अशा तीन मुलभूत गरजा असतात असे म्हटले जायचे पण आता कालानुरुप पढाईदवाई और कमाई यासुध्दा तितक्याच महत्वाच्या गरजा आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना समाविष्ट करण्याबरोबरच बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2 जून 2017 पासून लागू करण्यात आली असल्याचे श्री. फडणवीस यांनी योवळी सांगितले.
25 लाख बांधकाम कामगारांची नोदंणी करताना सर्व विभागांनी सहकार्य करावे तसेच 23 फेब्रुवारी ते 23 मार्च या 1 महिन्यात मोठया प्रमाणावर कामगारांची नोंदणी कशी होईलकामगार नोंदणीमध्ये कुठला जिल्हा मागे राहणार नाही याची काळजी कामगार विभागाने घ्यावी अशा सूचनाही यावेळी केल्या.

येणाऱ्या काळात राज्याचे कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य याबाबत धोरण कसे असेल याबाबतच्या धोरणाचे प्रारुप यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

यावेळी कामगार मंत्री यांनी कामगारांची नोंदणी विशेष नोंदणी अभियानअंतर्गत मुंबईपुणेनाशिक,औरंगाबादनागपूरआणि अमरावती येथील 96 ठिकाणी करण्यात येत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी व त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच बांधकाम कामगारांची नोंदणीजमा उपकरकल्याणकारी योजना यावर आगामी काळात भर देण्यात येणार आहे.

इमारत बांधकाम कामगारांनी विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी
•          इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
•          18 ते 60 वर्षे वयोगटातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येणार
•          इमारत व इतर बांधकाम (रोजगारनियमन व सेवाशर्ती) अधिनियमातील मुळ व्याख्येत समाविष्ट21 बांधकामावरील बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल.
•          विविध योजनांचा लाभ मिळविताना नोंदणी फी ठरविण्यात आली असून ती 25 रुपये इतकी आहे. तर दरमहा वर्गणी 1 रुपया आणि 60 रुपये पाच वर्षांसाठी आहे.

नोंदणीकरिता लागणारी कागदपत्रे
•          गेल्या वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
•          वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखलाजन्मप्रमाणपत्र)
•          पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे
•          रहिवासी पुरावा
•          छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा
•          बँक पासबुकची सत्यप्रत
लोकप्रतिनिधीकामगार संघटना आणि आस्थापना,





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments