लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 23 फेब्रुवारी 2018
व्हीजेटीआयचा दिमाखात दीक्षांत समारंभ
१,४०८ विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान
मुंबई, दि. २३ : पदवी आणि पदविका धारक विद्यार्थ्यांनी नौकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्हीजेटीआयच्या दीक्षांत समारंभात शुक्रवारी केले.
हा दीक्षांत समारंभ दिमाखात साजरा झाला असून या समारंभात व्हीजेटीआयच्या विविध पदविका शाखेतील ३७५, बीटेक ६९४, एमटेक २९० आणि एमसीएच्या ४९ आशा एकूण १,४०८ विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. यावेळी व्हीजेटीआयच्या चेअरपर्सन श्रीमती सॅन्ड्रा श्रॉफ, संचालक धीरेन पटेल, विविध शाखेचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.तावडे पुढे म्हणाले, महाविद्यालयातून पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनीनोकरी शोधण्यापेक्षा ती देणारे बनावे. त्यातून सामान्य माणसाच्या आपल्या पाल्यासाठी नौकरीविषयक ज्या अपेक्षा असतात त्या साध्य होतील. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत.राज्यातील शिक्षण संस्थामधील दर्जा चांगला आहे.मात्र विद्यार्थी किती आत्मसात करतो याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शैक्षणिक मूल्यांकन पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.तसेच परीक्षा पद्धतीत बदल करणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना परीक्षेत अभ्यासक्रमाशी सुसंगत असलेले प्रश्न असले पाहिजेत, असेही श्री. तावडे म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना शिक्षण मंत्र्यांचे थेट उत्तर
शासन आणि विद्यार्थ्यांमध्ये मुक्त संवाद घडविण्यासाठी दीक्षांत समारंभ ही एक संधी असल्याचे सांगून श्री. तावडे यांनी पदवी आणि पदविका धारक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची थेट उत्तरे दिलीत. यावेळी उत्तर देताना ते म्हणाले,शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचा साचेबद्ध विचार केला जातो.ही पद्धत बदली गेली पाहिजेत. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रवाह उपलब्ध व्हावेत आणि त्यांना या साचेबद्ध प्रथेतून बाहेर काढण्यासाठी राज्याचं शिक्षण विभाग ग्रेडिंग पद्धतीचा अवलंब करणार आहे.अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विविध शाखेत सुवर्ण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा श्री.तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्रीमती श्रॉफ यांनी दीक्षांत अहवाल सादर केला. तर श्री पटेल यांनी प्रास्ताविकात व्हीजेटीआयच्या नवीन उपक्रमांची आणि भविष्यातील देश हितासाठीच्या योगदानाबाबत माहिती दिली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments