लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
मोहोळमध्ये पोलिसांवर हल्ला करून पळून गेलेल्या सराईत दरोडेखोराच्या मुसक्या अखेर आवळल्या...
सोलापूर ग्रामीण च्या एलसीबी पथकाने गंगाखेडमधून घेतले ताब्यात!!
पंढरपूर LIVE 28 फेब्रुवारी 2018
मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संशयीत दरोडेखोरास अडवताना सदर दरोडेखोरांनी पोलिसांवरच हल्ला केला. यामध्ये दोन पोलिस जखमी तर रस्त्यावरुन जाणार्या एका इसमाचा मृत्यु झाल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेत सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले होते. यावेळी एका संशयीत दरोडेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले होते परंतु दोन गुन्हेगार पळुन गेले होते. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती. तेंव्हापासून सोलापूर ग्रामीण एलसीबी पथकाची टीम या दोन गुन्हेगारांचा कसुन शोध घेत होती. अखेर यातील एका अट्टल रेकॉर्डवरील दरोडेखोरास पकडण्यात एलसीबी पथकाला यश आले असून गंगाखेड, जि. परभणी येथून सराईत दरोडेखोर छगन उर्फ बाप्पा गंगाराम शिंदे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोहोळ पोलिस ठाणे येथे भा द वि कलम 302, 307, 333, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील व मंगळवेढा पोलीस ठाणे 396, 397 भा द वि प्रमाने दाखल गुन्ह्यातील आरोपी नाव छगन उर्फ बाप्पा गंगाराम शिंदे यास गंगाखेड जिल्हा परभणी हद्दीत गोपनीय माहिती काढून कौशल्याने पकडून LCB सोलापूर ग्रामीण च्या पथकाने ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी श्री एस. विरेश प्रभु सर,पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री मिलिंद महिते सर, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली , वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री विजय कुंभार यांचे नेतृत्वाखाली LCB सोलापूर ग्रामीण चे PSI हेमंत भंगाळे, PSI रियाज शेख, HC गोरख गांगुर्डे, HC नारायण गोलेकर, HC विजय भरले, PN रवी माने, PN अनंत(बाळू ) चमके, PC सागर शिंदे, PC अरुण केंद्रे, PC सचिन गायकवाड, PC व्यंकटेश मोरे,दरी. PC राहुल सुरवसे, Dri. PC आनंद डिगे यांचे पथकाने कामगिरी केली आहे.
छगन उर्फ बाप्पा गंगाराम शिंदे रा. जामगाव ता. मोहोळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध मालविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस पुढील तपास कामी मोहोळ पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आलेले असून अधिक तपास पोनि श्री राजेंद्र मस्के हे करीत आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments