लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 24 फेब्रुवारी 2018
पंढरपूर तालुक्यातील चळे अन सुस्ते येथील नदीपात्रात अवैध वाळु उपसा जोमात...
महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांचे 'अर्थपुर्ण' दुर्लक्ष?
पंढरपूर तालुक्यातील चळे व सुस्ते येथील भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळु उपसा होताना आढळत असून महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मात्र याकडे 'अर्थपुर्ण' दुर्लक्ष केलं जातय की काय? असा प्रश्न निर्माण होतो .
शासनाने वाळुचे लिलाव करण्यास स्थगिती दिली आहे. परंतु अवैधरित्या वाळु उपसा मात्र जोमात चालु आहे.
चळे व सुस्ते परिसरातील अनेक वाळु चोरटे जे.सी.बी. च्या सहाय्याने नदीपात्रात वाळु उपसा करत असून त्यांनी लाखो रूपयांच्या वाळुचा साठा परिसरात करून ठेवला असल्याची माहिती मिळतेय.
चळे येथील दर्लिंग मंदिराच्या परिसरात अवैधरित्या वाळु उपसा करून साठवलेल्या ढिगाऱ्यांचे फोटोही पंढरपूर लाईव्ह च्या हाती लागले आहेत. पंढरपूर तालुक्यातील अशा प्रकारे अवैध वाळु उपशाकडे दुर्लक्ष करून महसूल विभाग वाळु माफियांना अभय देण्यासोबतच प्रोत्साहन देत आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाळु उपशामध्ये कांही स्थानिक पुढारी, गावगुंडही सहभागी असल्याचे समजते. अवैध वाळु उपशामुळे या गावातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. "अनेकांच्या घरात या अवैध वाळु च्या विक्रीद्वारे लक्ष्मीचा संचार होत असल्याने सगळे काही 'आळी-मिळी गुपचिळी! ' असं बिनबोभाट चालु असल्याची चर्चा आहे.
"पंढरपूर चे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी ढोले साहेबांनी तरी याकडे लक्ष देवून अवैधरित्या बिनबोभाटपणे वाळु उपसा करणारांना लगाम घालावा!" अशी अपेक्षा! !
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments