यंंदाचे सहकार शिरोमणी वसंतराव काळे पुरस्कार जाहीर. डॉ.तानाजी चोरगे, गंगाधर म्हमाने, नवनाथ कसपटे, डॉ.दिलीप शिंदे, मानकरी.

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018


पंढरपूर (प्रतिनिधी) दि.06 वसंतदादा काळे प्रतिष्ठान पंढरपूरच्या वतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे जयंतीनिमित्त साहित्यकृती, शैक्षणिक, कृषी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज करणार्‍या व्यक्तींना सहकार शिरेामणी वसंतराव (दादा) काळे पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यंदा साहित्यकृती पुरस्कारासाठी लेखक डॉ.तानाजी चोरगे यांची वंशवेल  कादंबरी, शैक्षणिक कार्य पुरस्कार गंगाधर म्हमाने, कृषीभूषण पुरस्कारासाठी नवनाथ कसपटे तर समाजभूषण पुरस्कारासाठी डॉ.दिलीप शिंदे, यांना घोषित करण्यात आले. 10 हजार रु रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी ही घोषणा केली. 
  यावेळी निवड समितीचे डॉ.द.ता.भोसले, सिध्दार्थ ढवळे, बाळासाहेब काळे, शिवाजीराव बागल, भाऊसाो जगताप, सुधाकर कवडे, सलीम काझी, हणमंत जमदाडे, नानासाो काळे उपस्थित होते.   
  शनिवार दि.17 फेब्रुवारी 2018 रोजी सदर पुरस्काराचे पद्विभूषण माननीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब, माजी केंद्रीम गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब मांचे शुभहस्ते व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत  वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आम.टी.आम.) वाडीकुरोली, ता.पंढरपूर येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. 
  सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे पुरस्काराची व्यापकता वरचेवर वाढू लागली आहे. शून्यातून गरुडझेप घेवून कृषी, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात स्व.वसंतराव दादांनी नेत्रदिपक प्रगती केलेली होती. सहकार शिरोमणी वसंतराव काळे दादांच्या जयंतीदिनी वसंतदादा प्रतिष्ठानच्या वतीने गेली 9 वर्षापासून पुरस्कराचे वितरण करण्यात येते आहे. आजवर  कै.ज्ञानेश्‍वर बागल, राजकुमार पाटील, अशोक गोडगे, मंगला शहा,जे.जी.जाधव, भारत रानरुई, प्रार्थना ठोंबरे, अनिल कुलकर्णी, शामराव कोळवले, हरिश्‍चंद्र भिंगारे, दिपक देशपांडे, अभिजीत वडगांवकर, महानंदा साळूंखे, परमेश्‍वर राऊत, सोमनाथ अटकळे, मिनाश्री देशपांडे, अंकुश गाजरे, एस.एच.पवार, सुलोचना भांगे, भारत गदगे, लक्ष्मण आसबे, कृष्णा इंगोले, बद्रीनाथ तनपुरे, आर.डी.गायकवाड,अन्वर शेख, राजा माने, गोपाळराव देशमुख, शितल चव्हाण, सुधीर नाचणे, अंकुश पडवळे, सुशिल धसकटे, ज्ञानेश्‍वर भोसले, डॉ.बी.वाय.यादव, चंद्रकांत देशमुख, ज्ञानेश्‍वर चव्हाण,दत्तात्रय भोसले, दिनकर कांबळे, प्रा.शिवाजीराव बागल यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबददल पुरस्कराने गौरविण्यात आलेलेे आहे.  
सहकार शिरेामणी वसंतराव (दादा) काळे साहित्यकृती पुरस्कारः वंशवेल  या कांदबरीसाठी डॉ.श्री.तानाजीराव लक्ष्मणराव चोरगे मु.पो.चिपळूण जि.रत्नागिरी.  
  डॉ.श्री.तानाजीराव लक्ष्मणराव चोरगे मांची  वंशवेल  ही कादंबरी जीवनातील सुख दुःखाचा वेध घेणारी एका मुलीच्मा धाडसाची, जिददीची कहानी आहे. प्रसंगाशी, प्रतिकूल परिस्थितीशी सक्षमपणे, धीरोदात्तपणे सामना करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारी आहे. समाजाचा स्त्रीकडे बघण्माचा दृष्टीकोन, त्मातील मानवी स्वभाव, भाव-भावना, घटना, प्रसंग मांचे अत्यंत चित्तवेधक, रोमहर्षक वर्णन वंशवेल कादंबरीत करण्मात आलेले आहे. त्यांचं लेखन उच्च ताकदीचं, दमदार, प्रभावशाली आणि  विचार प्रवर्तक आहे.
नवा विचार, नवा ध्येयवाद, नवा आशावाद व्यक्त करणा-या वंशवेल फ मा साहित्य कृतीस सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे साहित्यकृती पुरस्कार देवून गौरविण्मात येत आहे.
सहकार शिरेामणी वसंतराव (दादा) काळे शैक्षणिक कार्य पुरस्कार - गंगाधर कुंडलिक म्हमाने रा.कोरवली,ता.मोहोळ,जि.सोलापूर.    
  अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर जिददीने, धैर्याने मात करत शिक्षण पूर्ण करुन केंद्रीम विद्यालमात ज्ञानदानाचं कार्म करत-करत स्पर्धा परीक्षेतून शासकीम सेवेत रुजू आणि शासकीम निममांच्मा आधीन राहून अनेक मुलांना, शिक्षकांना नि शिक्षण संस्थांना आपुलकीची साथ, मदतीचा हात देवून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, उन्नतीसाठी सातत्याने प्रमत्न केले आहेत. त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन, प्रशासकीम कौशल्य, अष्टपैलू व्यक्तीमत्व, कार्यतत्परता व निष्कलंकपणाचा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. 
  ग्रामीण भागातून शिक्षण घेवून शिक्षण क्षेत्रातील शिक्षणसंचालक मा सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास, मार्गक्रमण निश्‍चितच इतरांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्मा अलौकिक अतुलनीय योगदाना बददल शैक्षणिक कार्य पुरस्कारासाठी गंगाधार म्हमाणे यांची निवड करण्मात आली आहे. 
 सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे कृषिभूषण पुरस्कार - श्री.नवनाथ मल्हारी कसपटे  
मु.पो.गोरमाळे, ता.बार्शी, जि.सोलापूर.
  निसर्गाच्मा लहरीपणाशी दोन हात करत काळया मातीशी इमान राखत शेतीमध्मे नव-नवीन प्रयोग केले. कमी शिक्षण अत्यंत अपुरी साधने,प्रतिकुल भौगौलिक परिस्थितीतही एखाद्या उच्चशिक्षित संशोधकाला लाजवेल असे संशोधन त्मांनी अत्यंत जिदद, चिकाटी व  अविरत परिश्रम मा त्रिसुत्रीच्या आधारे साध्य केलेले आहे. पारंपारीक पध्दतीला ङ्गाटा देवून निर्यातक्षम ङ्गलोत्पादन,सिताङ्गळाच्या चार-पाच नवीन वाणांचे संशोधन, मधुबन नर्सरीचे निर्माण. प्रगत तंत्राचा वापर करुन वेळोवेळी भरघोस उत्पन्न. आपल्या बरोबरच इतर शेतकरी बांधवांचाही विकास व्हावा यासाठी त्यांना आपुलकीचे, तळमळीचे अमूल्य मार्गदर्शन, निश्‍चितच सामाजिक बांधीलकी दर्शविणारे आहे. नवोेदितांना माहिती व मार्गदर्शनासाठी सदैव  तत्पर असणारे त्यांचे व्मक्तीमत्व खरोखरच आभिमानास्पद व गौरवास्पद आहे. त्यांच्मा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्मासाठी सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे कृषीभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. 
 सहकार शिरेामणी वसंतराव (दादा) काळे समाजभूषण पुरस्कार - डॉ.श्री.दिलीप अधिकराव शिंदे मु.पो.सांगली, जि.सांगली. 
       हल्लीचे स्पर्धेचे युग, विभक्त कुटूंब पध्दती यामुळे अंथुरणांवर खिळलेेले रुग्ण, वृध्द, अपंग यांची सेवा शुश्रूषा करण्याची समस्या अनेक कुटूंबांना भेेडसावत आहे. ती एक सामाजिक समस्या होवू पाहत आहे. अशा काळात डॉ.दिलीप शिंदे  स्वतःच्या राहत्या घरात  संवेदना शुश्रूषा  केंद्र सुरु करुन सामाजिक बांधीलकी जपत अशा अनेक वृध्द, अपंग, निराधार लोकांना प्रेम, विश्‍वास, आधार व सुरक्षतिता देण्याचे असामान्य, अद्वितीय कार्य, अविरत, अविश्रांतपणे करीत आहेत. 
    समाजाविषमी असणारी परोपकारी वृत्ती, मदतीची आवड त्यास दिलेली कृतीची जोड वाखाणण्यासारखीच आहे. एवढमावरच न थांबता इतरांमध्येही परोपकारी वृत्ती जागृत करुन त्यांनाही आपल्मा या सामाजिक कार्मास प्रोत्साहित केले आहे. त्यांचे हे कार्म समाजाप्रती त्यांची असणारी संवेदनशिलता, कृतज्ञता व्मक्त करणारी आहे. 
  वृध्द, अपंग, निराधाराप्रती त्यांची असणारी आस्था,तळमळ, आपुलकी, निरपेक्ष सेवाभावीवृत्ती व सामाजिक बांधीलकीने प्रभावीत होवून सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. 



पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments