पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते सत्कार

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018





पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे यांच्या सेवानिवृत्ती दिनानिमित्त मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपाध्यक्ष विशाल मलपे, पक्षनेते व स्थायी समिती सदस्य अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सत्कार मुर्ती महादेव आदापुरे यांनी आपली सेवा बजावीत असताना आरोग्य विभागासारख्या संवेदनशील विभागात काम करुन नागरीक व भाविक यांच्या सेवेसाठी आपले संपुर्ण सेवेचा कार्यकाल आरोग्य विभागाकडे अतिशय प्रामाणिकपणे घालविला. तसेच सध्या शासनाकडुन पंढरपूर शहरातील कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. त्यामुळे सर्वांनी अतिशय चांगल्या रितीने कामे करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली व महादेव आदापुरे यांनी पुढील त्यांचे आयुष्य सुखी समाधानी आरोग्यमय जावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नाना वाघमारे, माजी अध्यक्ष भाई राजेंद्र भोसले, संघटक शरद वाघमारे, मंगेश देशपांडे, अनिल उत्पात, गटनेते अनिल अभंगराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, माजी पक्षनेते सचिन डांगे यांनी या सत्कारानिमित्त महादेव आदापुरे यांच्या कामाबद्दल आठवणी सांगुन गौरवउदगार काढले.  
यावेळी नगरसेविका रेणुका घोडके, सुप्रिया डांगे, शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, विक्रम शिरसट, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी नगरसेवक अरुण मंजरतकर, मामा दहिवाळकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन डांगे, इब्राहीम बोहरी, धर्मराज घोडके, आदित्य फत्तेपुरकर, अंबादास वायदंडे, कृष्णा वाघमारे, कामगार संघटनचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन शरद वाघमारे, प्रितम येळे,  सुनिल सोनार, गुरु दोडिया, किशोर खिलारे, धनजी वाघमारे, नागनाथ तोडकर, सुनिल बोडके हे उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे डॉ.संग्राम गायकवाड, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, सफाई कर्मचारी  तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments