लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018
अहमदनगर जिल्हा विभाजनाचे महसुलमंत्र्याचे संकेत
निलेश चाळक बीड : बीड जिल्ह्याचे विभाजन होऊन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी अशी मागणी दोन तीन दशकापासून आहे. अंबाजोगाई च्या मागणी नंतर ची मागणी असलेले महाराष्ट्रात अनेक जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र अंबाजोगाई जिल्हा निर्मिती प्रश्न तसाच रेंगाळत राहिला आहे. महाराष्ट्रात ज्या वेळी इतर जिल्ह्यानिर्मिती किंवा आयुक्तालयाच्या निर्मित चे चर्चा होते त्याच वेळी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती ची चर्चा होते.मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी जिल्हा निर्मिती प्रश्न तडीस जाणार नाही. मोठ्या जनआदोंलनाची गरज आहे . तर काल महसूल मंत्री यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाचे संकेत दिल्यानंतर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती आशादायक चर्चा सुरू होऊन प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निलेश चाळक बीड : बीड जिल्ह्याचे विभाजन होऊन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी अशी मागणी दोन तीन दशकापासून आहे. अंबाजोगाई च्या मागणी नंतर ची मागणी असलेले महाराष्ट्रात अनेक जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र अंबाजोगाई जिल्हा निर्मिती प्रश्न तसाच रेंगाळत राहिला आहे. महाराष्ट्रात ज्या वेळी इतर जिल्ह्यानिर्मिती किंवा आयुक्तालयाच्या निर्मित चे चर्चा होते त्याच वेळी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती ची चर्चा होते.मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी जिल्हा निर्मिती प्रश्न तडीस जाणार नाही. मोठ्या जनआदोंलनाची गरज आहे . तर काल महसूल मंत्री यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाचे संकेत दिल्यानंतर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती आशादायक चर्चा सुरू होऊन प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भौगोलिक दृष्ट्या दृष्टया बीड जिल्हा मोठा असल्याने प्रशासकीय दृष्ट्या गैरसोय होऊ नये यासाठी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणावर पुढे आली होती. नव्वद च्या दशकात जिल्हा निर्मिती च्या मागणी साठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले होते. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना अंबाजोगाई जिल्हा निर्मिती चे आश्वासन दिले होते. युती सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, आघाडी सरकारचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही अंबाजोगाई जिल्हा झालाच "समजा" चा आश्वासन दिले होते . स्व विमलताई मुंदडा यांनी जिल्हा निर्मिती साठी विशेष प्रयत्न केले. मात्र जिल्हा निर्मिती घोषणा राहिलीच.
मराठवाड्यात औरंगाबाद नंतर दुसरे विभागीय आयुक्तालय निर्मिती च्या वेळीही अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची शक्यता होती. मात्र आयुक्तालय लातूर की नांदेड हा वाद न्यायालया पर्यंत ताणला गेला. आयुक्तालय प्रश्न रेंगाळला आणि अंबाजोगाई जिल्हा निर्मिती चा ही अनिर्णित राहिला. आघाडी सरकार गेले. स्व विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर तर अपेक्षा च राहिली नव्हती.
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती च्या मागणी नंतर ची मागणी असणारा हिंगोली, वाशीम, गोंदिया, पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली अंबाजोगाई चे भिजत घोंगडे ठेवल्याने अंबाजोगाई जनता नाराजी असली तरी अजूनही अपेक्षा आहेत. फडणवीस सरकारने छोट्या जिल्हा निर्मिती साठी प्रयत्नरत असल्याचे धोरण स्पष्ट होत असताना अंबाजोगाई जिल्हा घोषणा होईल अशी अंबाजोगाई च्या अपेक्षा उंचावल्या आहेत.इतर प्रस्तावित जिल्ह्यापेक्षा अंबाजोगाई जिल्हा निर्मिती सोपी
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठी आवश्यक असणारी सर्व शासकीय कार्यालयाची इमारती तयार स्थितीत आहेत. अतिरिक्त स्तर चे काही अधिकारी ही कार्यरत आहेत. तसेच प्रशासकीय दृष्ट्या सोईचे ठिकाण म्हणून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती सोपी आहे.
स्व. विमलताई मुंदडा चे विशेष प्रयत्नस्व विमलताई मुंदडा आघाडी सरकार मध्ये मंत्री म्हणून कार्यरत असताना अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठी आवश्यक असणारे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, भूसंपादन कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पदस्थपणा केली होती. कार्यालये कार्यरत केली मात्र जिल्हा घोषणा त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.
ना.पंकजा मुंडे ना संधीजिप निवडणुकी नंतर भाजप बहुमत दूर असताना निवडणूक आणि अध्यक्ष निवडीच्या काळात अंबाजोगाई जिल्ह्याची नवनिर्मित जिल्हा परिषदेची चर्चा राजकीय वर्तुळात झाली. मात्र सुरेश धस नी भाजप ला मदत केल्याने जिल्हा परिषद चित्र वेगळे राहिले आहे. नगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या प्रश्न जेवढ्या आत्मीयतेने हाताळत आहेत त्याच आत्मीयतेने ना. पंकजाताई नि अंबाजोगाई जिल्हा निर्मिती चा प्रश्न हाताळ न्याची संधी आहे
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments