पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनच्या वतीने पंढरपूर लाईव्ह कार्यालयात शिवजन्मोत्सव

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 19 फेब्रुवारी 2018





पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनच्या वतीने आज पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी पेढ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. 

यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले म्हणाल्या की, "पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे करण्यात येतात ही बाब कौतुकास्पद आहे. आपल्या भावी पिढीला व तरुणाईला महापुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने असे उपक्रम राबविणं आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास मनात जेवढा ठेवणं आवश्यक आहे. तेवढंच त्यांच्या प्रेरणादायी इतिहासातून बरंच कांही शिकण्यासारखं सुध्दा आहे. तरुणांनी छत्रपती शिवरायांचे जीवनातील विविध प्रसंगाचा अभ्यास करुन वेळप्रसंगी शिवरायांनी दाखविलेला गनिमी कावा, धाडस व स्वाभिमान आपल्या अंगी जोपासावा."

यावेळी पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनच्या उभारणी संदर्भात व याद्वारे भविष्यात राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती भगवान वानखेडे यांनी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांना दिली. यावेळी  पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनचे विजयकुमार गायकवाड, समाधान ताड व पंढरपूर लाईव्हच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होणारे तरुण समाजसेवक शैलेश आगावणे व इतर अनेकजण उपस्थित होते.   




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments