15 मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिन..! डिजीटल युगात बना स्मार्ट ग्राहक !!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 मार्च 2018


जगभरात 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या यांबाबत जागृती करण्यासाठी असणाऱ्या या दिनाबाबत विशेष लेख…
- हर्षल आकुडे, संहिता लेखक, जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर.
ध्याचे युग डिजीटल युग आहे. इंटरनेटच्या आगमनानंतर ईृ-कॉमर्स क्षेत्र प्रचंड विस्तारले आहे. मोठमोठ्या सॉफ्टवेअर, मोबाईलच्या कंपन्यांना मागे टाकत ई-कॉमर्स कंपन्या जगात सर्वांत जास्त आर्थिक उलाढाल  करणाऱ्या कंपन्या बनल्या आहेत. घरबसल्या एका क्लिकवर वस्तूंची खरेदी करता येत असल्याने ग्राहकांचाही त्याला चांगला प्रतिसाद आहे. डिजिटल युगात सर्व बदल घडत असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांनी स्वतः स्मार्ट बनण्याची आवश्यकता आजघडीला निर्माण झाली आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील वाढ तसेच ऑनलाईन ग्राहकांचे हित लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी मेकिंग डिजीटल मार्केट प्लेसेस फेअर ही थीम निश्चित करण्यात आली आहे.
पुर्वीच्या काळी दुकानात येऊन वस्तू घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक अशी ग्राहकाची व्याख्या होती. आजच्या काळात ग्राहक या शब्दाची व्याख्या बदलू लागली आहे. वस्तू विक्री करणाऱ्याचा चेहराही पाहिलेला नसताना ऑनलाईन माध्यमातून संकेतस्थळावरची वस्तू विकत घेणे आता नवीन राहिलेले नाही. जगभरात दरवर्षी सुमारे दीडशे कोटींहून अधिक ग्राहक ऑनलाईन वस्तूंची खरेदी करत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ऑनलाईन बाजारपेठेचा आवाका लक्षात घेऊन अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. ग्राहकांना थेट सेवा देणे, मोठ्या प्रमाणात सवलत देणे यामुळे  ग्राहकांना आकर्षित करण्यास ते यशस्वी ठरत आहेत.
मात्र ऑनलाईन बाजारपेठेचे धोके, फसवणुक या बाजूही ग्राहकांनी समजून घेणे आवश्यक बनले आहे. अनेक कंपन्या ग्राहकांच्या खात्याची पूर्णपणे माहिती मिळवून त्याचा दुरूपयोग करता, असे निदर्शनास आले. तर अनेकवेळा आपण ऑर्डर दिलेल्या वस्तूऐवजी दुसरीच एखादी वस्तू ग्राहकांना मिळाल्याचे दिसून येते. या वस्तू परत करण्याची प्रक्रियाही वेळखाऊ असल्याने अनेकजण मिळालेल्या वस्तूबाबत समाधान मानून घेतात. ऑनलाईन पैसे भरत असतान पैसे कट होण्याचे प्रकारही आढळतात. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून व्यवसाय करण्याचे दिवस आता गेले का असा प्रश्नही आजकाल उपस्थित होतो. त्यामुळे आजच्या काळात ग्राहकांनीच स्मार्ट बनून फसवणूक टाळावी.
कोणत्याही संकेतस्थळावर बँक खात्याची माहिती देताना त्या संकेतस्थळाची विश्वासार्हता घेऊनच वस्तूंची खरेदी करावी. सर्व सामान्य ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा, वॉरंटी, गॅरंटी, विविध ऑफर यांची माहिती घ्यावी. प्रलोभनांना बळी पडून अनावश्यक वस्तूंची खरेदी करू नये. तरच वस्तू खरेदी केल्याचे योग्य ते समाधान मिळेल. 

ग्राहकांनी घ्यावयाची काळजी
-         विश्वसनीय संकेतस्थळांकडूनच खरेदी करावी.
-         आपल्या बँक खात्याचे तपशील कोणत्याही संकेतस्थळाला देऊ नये.
-         ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना गेटवे विश्वसनीय आहे, याची खात्री करावी.
-         वन टाईम पासवर्ड कोणासोबतही शेअर करता कामा नये
-         ऑर्डर केलेली वस्तू आणि  मिळालेली वस्तू यांमध्ये तफावत आढळल्यास तत्काळ संबंधित कंपनीला कळवावे.
-         एक जागृत ऑनलाईन ग्राहक म्हणून सखोल विचार करून वस्तू ऑर्डर करावी.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments