गाणगापूर-पंढरपूर एस.टी. बसमध्ये बेशुध्द अवस्थेत आढळले विवाहीत दांपत्य..!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 15 मार्च 2018

गाणगापूर-पंढरपूर या कर्नाटकच्या एस.टी. बसमध्ये एक विवाहीत दांपत्य बेशुध्दावस्थेत आढळले. या बसमधील सर्व प्रवाशी एस.टी. बसमधून खाली उतरले परंतु हे विवाहीत जोडपे एस.टी. बसमध्येच बसलेले आढळल्याने एस.टी. बसच्या वाहकानेे त्यांच्याजवळ जाऊन पाहणी केली असता हे दोघेही बेशुध्दावस्थेत असल्याचे आढळून आले. वाहकाने व चालकाने प्रसंगावधान राखून या दांपत्यांस तातडीने पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

याबाबत पंढरपूर लाईव्हने पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. चंद्रकांत गोसावी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असताना. अधिक माहिती मिळाली की, या जोडप्यास पंढरपूरमध्ये येण्यापूर्वीच गुंगीचे औषध देण्यात आले असावे किंवा अन्न-पाण्यातून कांही गुंगीचे औषध प्राशन केले गेल्यामुळे त्यांना गुंगी आली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. रात्रीच्या साडे आठ वाजेपर्यंत तरी हे दांपत्य शुध्दीत आलेले नव्हते. त्यांचे सर्व सामान, मोबाईल, दागदागिणे व चीजवस्तु त्यांच्या सोबत सुरक्षीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधला असून त्यांचे नातेवाईकांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.

हे विवाहीत दांपत्य विदर्भातील अकोला येथील असून यांचे आडनांव शिंदे असल्याचे समजते. कदाचित देवदर्शनासाठी हे गाणगापूरला गेले असावेत व तेथून एस.टी. ने पंढरपूरकडे येत असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.  परंतु त्यांच्यासोबत कुणीच नातेवाईक नव्हते का?  जर लुटपाटीच्या उद्देशाने यांना बेशुध्द केले असेल तर यांच्याजवळील सर्व मौल्यवान वस्तु व सामान त्यांच्यासोबत सहीसलामत कसे? नेमका हा प्रकार काय? या प्रश्‍नाचे उत्तर हे दोघे शुध्दीत आल्यानंतरच समजेल.






पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments