डॉ. पतंगराव कदम यांना राज्य आणि केंद्र शासनाने मरणोत्तर ‘महाराष्ट्र भुषण आणि भारतरत्न’ देवून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करावा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 15 मार्च 2018

आटपाडी (प्रतिनिधी)  शून्यातून विश्व निर्माण करुन आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे हिमालयाची उंची गाठलेल्या डॉ. पतंगराव कदम यांना राज्य आणि केंद्र शासनाने मरणोत्तर ‘महाराष्ट्र भुषण आणि भारतरत्न’ देवून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करावा अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी व्यक्त केली. 

राज्याचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्थिंचा कलश आटपाडी येथे लोकांच्या दर्शनासाठी आणला गेला होता. कल्लेश्वर मंदिर येथे सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 
सर्वस्पर्शी, सर्वमान्य, सर्वप्रिय, सर्वदूर आणि सर्वोत्तम नेतृत्व असलेल्या डॉ. पतंगराव कदम यांनी अक्षरशः शुन्यातून प्रचंड विश्व निर्माण केले. असे स्पष्ट करुन सादिक खाटीक पुढे म्हणाले. त्यांनी हजारो गरीबांचे संसार उभे केले. जनतेला सहाय्यभूत ठरतील अशा हजारो कोटींच्या शेकडो संस्था- शाखा उभारल्या. त्यांच्या गगनभेदी कर्तृत्वाकडे बघितल्यास ते ख-या अर्थाने महाराष्ट्र भूषण होतेच. तथापी ते खरेखुरे भारत रत्न होते. 
सादिक खाटीक पुढे म्हणाले, मुख्यमंत्री पदापेक्षा प्रचंड मोठे कर्तृत्व असलेल्या डॉ. पतंगराव कदम यांना मुख्यमंत्री न करुन काँग्रेस नेतृत्वाने अप्रत्यक्षरित्या मोठा अन्यायच केला. वास्तविक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आधीच पतंगराव कदम यांना मुख्यमंत्री केले जाणे न्यायाचे होते परंतु पतंगरावांच्या हयातीत ते घडले नाही. हे दुःखदायी आहे. २०१९ ला राज्यात आणि देशात काँग्रेस आणि त्यांचे समर्थक पक्ष सत्तेवर येणार आहेत. याची चुणूक आजच घोषीत झालेल्या लोकसभेच्या तीन जागांच्या पोट निवडणूक निकालातून दिसून येते. राज्यात येवू घातलेल्या सत्तेमध्ये काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते म्हणून विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाला सहमती देवून पतंगरावांच्या बाबतीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करावी. असेही शेवटी सादिक खाटीक बोलून गेले.
आटपाडी बसस्थानकाजवळ आलेल्या कै. डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्त्तींच्या कलशाचे जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील आणि इतर  अनेकांनी दर्शन घेतले. अमर रहे अमर रहे पतंगराव साहेब अमर रहे च्या घोषणा देत कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात हा अस्ती कलश लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी झालेल्या शोक सभेत अनेक मान्यवरांनी पतंगराव साहेबांच्या कार्यकर्तुत्वाच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. पतंगराव साहेबांच्या जाण्याने आटपाडी तालुक्याचे मोठे नुकसान झाले. गरीबातल्या गरीब माणसांची कदर करणारे ते एक देव अवतारी महामानव होते आटपाडी तालुक्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्यामुळे अनेक विकास कामे निर्माण झाली. अशा शब्दात अनेकांनी आदरांजली वाहिली. सांगली जि. प. चे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख, जिल्हा कॉंग्रेस जेष्ठ नेते शिवाजीराव तात्या पाटील, भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील, भाजपा जेष्ठ नेते बंडोपंत देशमुख, कॉंग्रेस आय राज्याचे नेते राजाराम देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, कॉंग्रेसचे युवक नेते जयदीप भोसले, राहुल गायकवाड, माणगंगा उद्योग समूहाचे नेते आनंदराव पाटील, वसंतदादा जिल्हा दुध संघाचे चेअरमन विष्णुपंत चव्हाण पाटील, शिवसेना नेते मोहनभाऊ देशमुख, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव गायकवाड, प्रदीप पाटील सर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील सर, जि. म. बँकेचे माजी संचालक शशिकांत देठे, माजी प्राचार्य जे. आर. चव्हाण, शिवाजीराव कदम कौठूळी, ऋषिकेश देशमुख, माजी उपसभापती बळवंतराव मोरे, पतंगराव गायकवाड गुरुजी, सिद्धेश्वर बाड, आटपाडीच्या सरपंच सौ. स्वाती रावसाहेब सागर, कु. पूजा पाटील, प्रा. हेमंत कुलकर्णी, विठ्ठल पंडित, मनोहर विभूते, डॉ. एम. वाय. पाटील इत्यादी अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंचायत समिती सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती रुक्मिणीताई यमगर, जेष्ठ ग्रा.प सदस्य पोपट नाना पाटील, अनिल शेठ पाटील, विनायक पाटील, सुरज पाटील. समाधान भोसले .भाऊसाहेब हाके, शिवाजीराव माळी, संजय भिंगे,अभिजीत देशमुख, महेश देशमुख सर (पलुस), राजेंद्र देशमुख(पुणे), पांडुरंग देशमुख, स्नेहजीत पोतदार, जगन्नाथ सपाटे,इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments