पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्‍नावर आमदार भारतनाना भालके यांचा विधानसभेत तारांकीत प्रश्‍न!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 15 मार्च 2018

पंढरपूर ः दि.15 - सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम प्रभावीपणे राबविणेसंदर्भात आमदार श्री भारत भालके यांनी  दि.14.03.2018 तारांकित प्रश्‍न क्र.110903 या पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्‍नावर विधानसभेमध्ये तारांकित प्रश्‍न उपस्थित केला.
पंढरपूर-मंगळवेढा येथील नागरिकांना व दुष्काळी भागातील गोर-गरीब जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून राज्यात आघाडी सरकार असतांना वारंवार पाठपुरावा करून विविध ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रामुख्याने मंजूर करून त्या योजना तातडीने कार्यान्वीत होणेबाबत शासनाकडे पाठपूरावा करून मंजूरी घेऊन मोठ्या प्रमाणात निधी आणला. परंतु त्यातील काही योजना सध्याच्या युती सरकारने निधी न दिल्यामुळे व अधिकार्‍यांच्या व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे अद्यापही अपुर्ण अवस्थेत आहे. तसेच मतदार संघातील पाणी पुरवठा विभागा अंतर्गत राबविण्यात येणार्‍या ग्रामीण पाणी पुरवठा योजना अद्यापही निधी अभावी प्रलंबित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणुन दिले आहे.
आमदार श्री भारत भालके यांच्या सदर तारांकित प्रश्‍नावर शासनाच्या वतीने पाणी पुरवठा मंत्री मा.ना.श्री बबनराव लोणीकर यांनी लेखी उत्तरामध्ये असे नमुद केले आहे की, दि.07.05.2016 रोजीच्या शासन निर्णयामध्ये राज्यामध्ये सन 2017 ते 2020 या कालावधीमध्ये ग्रामीण पेयजल कार्यक्रम घेण्यात आला आहे. सदर कार्यकमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील रू.33.62 कोटी इतक्या किंमतीच्या 33 पाणी पुरवठा योजना नव्याने राबविण्याचे प्रस्तावित आहे. सद्यःस्थिती मध्ये सदर कार्यक्रमांतर्गत रू.15.40 कोटी इतक्या किंमतीच्या सुमारे 11 नवीन पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. सदर 11 योजनांच्या निविदा प्रसिध्द करण्यात आल्या असून कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही सुरू आहे.
परंतु आमदार श्री भारत भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील प्रश्‍नाबाबत आक्रमक भुमिका घेऊन संबंधित पाणी पुरवठा मंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असतांना त्यांनी केलेल्या वक्तव्याची या तारांकित प्रश्‍नाद्वारे वस्तुस्थिती विचारली असून यामध्ये संबंधित पाणी पुरवठा मंत्री यांनी सोलापूर जिल्ह्यात रू.28 कोटी निधी दिल्याची घोषणा दि.31 डिसेंबर, 2017 च्या सुमारास वक्तव्य केल्याचे संपूर्ण वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली असल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे संबंधित विषयाला पाणी पुरवठा मंत्री यांनी गोल-गोल उत्तर देऊन घुमजाव केल्याचे निदर्शनास आले आहे. कारण त्यांनी 28 कोटी रूपये निधी दिल्याची घोषणा केली होती, परंतु 15 कोटीच रूपये निधी देणार असल्याची वस्तुस्थिती आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments