पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 15 मार्च 2018

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने

आज पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी नगरपरिषदे समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा साधानाताई नागेश भोसले, गटनते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, अमोल डोके, धर्मराज घोडके यांना संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, महादेव अदापुरे, नानासाहेब वाघमारे, शरद वाघमारे, प्रितम येळे, नागनाथ तोडकर, संतोष सर्वगोड, किशोर खिलारे यांनी दिले.

महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्याबाबत दि,24 आगस्ट 017 रोजी संघर्ष समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर, नगरपरिषद आयुक्त विरेंद्रसिंह यांच्या बरोबर राज्यातील  कामगार संघटना पदाधिका-यांची चर्चा होऊन नगरपरिषद कर्मचा-यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु मान्य झालेल्या मागण्यांवर कोणतीही कार्यवाही न  झाल्याने राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचारी यांचे मध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळेमुबंई येथे 22 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या महामोर्चाच्या आंदोलनामध्ये एप्रिल 2018 चा वेतनात वा वेतन लागू न केल्यास व इतर मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता व १५ मार्च २०१८ रोजी आपल्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद् कर्मचारी समन्वय समितीचीवतीने  राज्यभर नगरपरिषदे समोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापुर्वी  संवर्ग/ कंत्राटी/ रोजंदारी/ सफाई/ कायम / मानधना वरील नगरपरिषद व नवीन नगरपंचायत मधील कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी  राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल. कराड व  राज्याचे जनरल सेक्रटरी सुनिल वाळुजकरपुणे विभागाचे अध्यक्ष प्रा.ए.बी.पाटीलकार्याध्यक्ष धंनजय पळसुले,हरी माळी रामदास पगारे ,पोपटराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलने करण्यात आली होती. या मध्ये नगरपरिषद कर्मचा-याना  7 वा वेतन आयोग लागु करणे,रोजंदारी, कंत्राटी कामगार यांना कायम करणे व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतनाची अंमलबजावणी करणे, विना शर्त विना अट सर्व अनुकंपा धारकांना सेवेत सामावून घ्या२७ मार्च २००० पर्यंत रोजंदारी कर्मचा-यानां कायम करणेनगरपरिषद कर्मचा-याना २४ वर्ष कालपद्ध  पदोन्नती लागु करणेजुनी पेन्शन योजना लागू करानवीन नगर परिषदनगर पंचायत मधील कायम  कर्मचारीसफाई  कर्मचारी यांचे समावेश करा व वा वेतन आयोग प्रमाणे वेतन लागू करून 100% वेतन अनुदान द्यासंवर्ग कर्मचारी चे रिक्त पदे भरा, त्यांना पदोन्नत्ती द्या, नवीन जाचक बदली धोरण रद्द करा, नवीन झालेली उपनगरे हद्दवाढ विचारात घेऊन वाढीव पदे निर्माण करून ती त्वरीत भरा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. शासनाने कर्मचा-याच्या ७ वा वेतन आयोग व इतर मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास एप्रिल मध्ये महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सदरचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पोपट जाधव, सुनिल बोडके, दत्तात्रय चंदनशिवे, गुरु दोडिया, जयंत पवार, अनिल अभंगराव, पराग डोंगरे, संजय वायदंडे, अनिल गोयल, गमजी वाघेला, दशरथ यादव, संजय माने, धनजी वाघमारे, दिनेश साठे, सुलभा आंबरे, राधा बंगाळे, जया वाघेला, नंदा पाटोळे, मंगल दंदाडे, शोभा शिंदे, जया सातपुते यांनी प्रयत्न केले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments