लोकमान्य विद्यालयात रिटेल व मल्टिस्किल कक्षाचे उद्घाटन व आनंद मेळावा साजरा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 15 मार्च 2018




लोकमान्य विद्यालयात रिटेल व 
मल्टिस्किल कक्षाचे उद्घाटन व आनंद मेळावा साजरा

 पंढरपुर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत रिटेल व मल्टिस्किल कक्षाचे व कौशल्य विकास प्रदर्शनाचे उद्घाटन मा.आमदार श्री प्रशांत परिचारक, मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास ह.भ.प.वा ना उत्पात महाराज हे अध्यक्ष होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ व वेगवेगळ्या वस्तुंचे स्टॉल मांडले व व्यवसाय कसा करावा व खरेदी विक्री करून नफा कसा मिळवावा याचा अनुभव घेतले. सर्व पाहुण्यांनी खाद्यपदार्थ विकत घेऊन त्याचा आनंद घेतला,त्यांचे कोतुक केले यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. याप्रसंगी बोलताना मा.आ.श्री प्रशांत परिचारक म्हणाले की मुलांना कौशल्याभिमुख शिक्षण द्यायला पाहिजे जेणे करुन मुले फक्त नोकरीवर अवलंबुन न राहता स्वतःचा व्यवसाय ऊभा करुन इतरांना नौकरी देणारी बनतील.अनेक नामवंत लोकांनी छोट्या छोट्या व्यवसायापासुन सुरुवात करुन आज त्या जगातील मोठ्या नामवंत कंपन्या बनल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी मुलांना कौशल्याबरोबर ज्ञानाची शिदोरी दिली. भगवताचार्य वा.ना.उत्पात यांनी सांगितले की स्पध्येच्चा युगात अशा प्रकारचे माहिती व तंत्रज्ञान मिळाल्यास विध्यार्थी निश्चित नौकरीवर अवलंबून न राहता उद्दोजक होतील , त्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विनायक हरिदास व  प्राध्यापक संजय रणदिवे यांनी विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाच्चा शुभेच्छा दिल्या व सांगितले की शालेय जीवनामध्ये अशा प्राक्टिकल गोष्टी चा विद्यार्थांनी आभ्यास केला तर स्पर्धेचे युगात ते नवनवीन होणारे बदल स्वीकारून निश्चित आदर्श मार्गाने व्यवसाय अथवा नोकरी करतील.  कार्यक्रमास प्रमूख पाहुणे म्हणुन शिक्षण समीती सभापती विवेक परदेशी,  गटनेते अनिल अभंगराव, गुरूदास अभ्यंकर, सचिन डांगे, नगरसेवक  ऋषिकेश उत्पात, नरसिंह शिंगन,श्रीमती शकुंतला नडगिरे, रेणुका घोडके,  बस्वेश्वर देवमारे, पत्रकार विनायक हरिदास व प्रा.श्री.संजय रणदिवे आदिमान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सदानंद डिंगरे यांनी केले तर सुत्रसंचालन श्री धनंजय मिसाळ यांनी व आभार साखरे मॅडम यांनी मानले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक श्री अभय आराध्ये , श्री रर्वीद्र लांबतुरे  ,  श्री नलगेशी सर , श्री हाके सर व सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments