लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 15 मार्च 2018
सोलापूर, दि. 15 :- विकास कामात समाज माध्यमे अतिशय प्रभावी भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज येथे व्यक्त केले.
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोशल मीडिया महामित्र संवादसत्र उपक्रम आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक सतीश देशपांडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, गृह मंत्रालयाचे अधिकारी रवींद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.
श्री. भारुड म्हणाले, ‘ कोणत्याही माध्यमात शक्ती असते. पण त्या शक्तीचा विधायक वापर करण्याची आवश्यकता आहे. मात्र बहुतांश वेळा समाजाला काय आवडते ते माध्यमे देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे समाजाची मानसिकता काय असते त्यानुसारच माध्यमे संदेश देतात. पण समाज माध्यमांची परिस्थिती वेगळी आहे. समाज माध्यमावर प्रत्येक व्यक्ती आपला सहभाग नोंदवू शकतो. मात्र हा सहभाग विधायक कामासाठी, विकासासाठी असायला हवा. राज्य शासनाच्या महामित्र उपक्रमामुळे युवक समाज माध्यमावर आधिक सकारात्मकरित्या कार्यरत होतील’.
राज्य शासन महिला, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, व्यापारी अशा समाजातील घटकांसाठी विविध योजना राबवत असते. योजनांची समाज माध्यमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
श्री. देशपांडे म्हणाले, ‘ तरुणांनी समाज माध्यमांच्या मदतीने करिअर, शिक्षण, व्यक्तीमत्व विकास यासारख्या क्षेत्रांचा अभ्यास करावा. स्वत:च्या प्रगतीसाठी समाज माध्यमांचा वापर केल्यास तरुणांची प्रगती होईल. त्यांना नवनवी संधी उपलब्ध होतील’.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘ समाज माध्यमांचा वेग जास्त आहे. भाषा, प्रांत, देश या पलिकडे समाज माध्यमाची ताकद आहे. समाज माध्यमात विधायक आणि विध्वंसक अशा दोन्ही प्रकारची ताकद आहे. मात्र तरुणांनी समाज माध्यमांच्या विधायक ताकदीचा वापर करायला हवा. कारण तरुणांतच समाज माध्यमाला विधायक वळण लावण्याची ताकद आहे’.
यावेळी मोहीनी गांधी, शिवशंकर स्वामी, गोरक्षनाथ भांगे आणि प्रा. नरेंद्र काटीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी केले. अक्षय कट्टी यांनी सूत्रसंचलन केले. माहिती सहाय्यक एकनाथ पोवार, सचिन बहुलेकर, हर्षल आकुडे, अमित खडतरे, भाऊसाहेब चोरमले यांनी संयोजन केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments