ग्राहकहितासाठी तंत्रज्ञानाच्या वापरास प्राधान्य- जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 15 मार्च 2018

जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

सोलापूर, दि. 15 : सध्याचे युग डिजीटल बाजारपेठेचे आहे. ही बाजारपेठ पारदर्शी असली पाहिजे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तंत्रज्ञानाचा वापर ग्राहकांच्या हितासाठी करण्यास शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन अन्न धान्य वितरण व जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी आज केले.
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त होम मैदान येथे आयोजित कार्यक्रमात श्री. पाटोळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहायक अन्नधान्य वितरण व जिल्हा पुरवठा अधिकारी रमा जोशी, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य शोभना सागर, आनंद सागर, राष्ट्रीय ग्राहक पंचायतचे दीपक इरकल, शशिकांत हरिदास, निबंध स्पर्धेचे प्रायोजक राजेश फडकुले आदी उपस्थित होते.
श्री. पाटोळे म्हणाले, ‘मेकिंग डिजीटल मार्केट प्लेसेस फेअरर’ ही यंदाच्या ग्राहक हक्क दिनाची थीम आहे. प्रामाणिक  बाजारपेठ ग्राहकांसाठी उपलब्ध झाली पाहिजे यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने मागील चार वर्षांपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. शासकीय गोदामांमध्ये वजनी काट्यांऐवजी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
ग्राहक संरक्षण कायद्याची ग्राहकांमध्ये जागृती व्हावी म्हणून दरवर्षी 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त  ग्राहक संरक्षण परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी हुतात्मा चौक येथून ग्राहक जागृती रॅलीला सुरूवात झाली. विविध शासकीय अधिकारी, एसटी चित्ररथ तसेच सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत ग्राहकांचे प्रबोधन व जागृती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डफरीन चौक, हरिभाई देवकरण प्रशाला मार्गे रॅली कृषी महोत्सावातील सभामंडपात विसर्जित झाली.
रमा जोशी यांनी प्रास्ताविक केले. शोभना सागर, शशिकांत हरिदास, दीपक इरकल आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. सुधीर जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रसन्न सोनवणे यांनी आभार मानले.

निबंध स्पर्धेत सीताफळे सह जेवरगी, कदम यांचे यश
ग्राहक मंचाने घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धेच्या पुरस्कारांचे  वितरण करण्यात आले. यामध्ये नंदिनी सीताफळे, मधुरा जेवरगी व कार्तिकी कदम यांना गौरवण्यात आले

*****





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments