महिलांनी स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावे- जिल्हा न्यायाधीश-पी.आर.देशमुख

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 15 मार्च 2018



           पंढरपूर, दि. 15 -  शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्ष्मीकरणांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. शासनाने महिलांसाठी सर्वसमावेशक असे महिला धोरण निश्चित केले असून, शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनेचा लाभ घेवून  महिलांनी स्वावलंबी व स्वंयपूर्ण व्हावे असे मत जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व अर्बन बँक पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी सभागृह पंढरपूर येथे आयोजित केलेल्या कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर व विविध स्तरावर उल्लेखनिय काम करणा-या महिलांचा सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुलभा वटारे, अर्बन बँकेचे मुख्य अधिकारी श्री. विरध्‍े,  बँक शाखाधिकारी अंजली तेलंग आदी उपस्थित होते.
न्यायाधीश देशमुख म्हणाले शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महिला धोरण राबवित असते. या धोरणांमध्ये महिलांवरील अत्याचार, हिंसा, महिला विषयक कायदे, आर्थिक दर्जात सुधारणा, महिला बचत गट आदी बाबींचा विचार केला आहे. त्याचबरोबर  आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्मातून कोणतीही माहिती सहज उपलब्ध होत असून, महिलांनी तंत्रज्ञानाचा या सहाय्याने सक्षम होणे गरजेचे आहे. असे ही जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांनी सांगितले.
महिलांनी कायद्याबाबतचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. कारण याव्दारेच महिलांना त्यांच्यावर होणारे आत्याचाराविरुध्द  लढता येते. आज स्त्रियांनी स्वावलंबी होणे आवश्यक आहे. त्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे न्यायाधीश बाविस्कर यांनी सांगितले. यावेळी डॉ.वर्षा काणे बोलताना म्हणाल्या की,  स्त्री ही सर्वगुण संपन्न असून,  आहार, विहार  आणि विचार  या तिन  गोष्टी स्त्रीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करीत असतात. त्यासाठी स्त्रीयांनी योग्य आहार व व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच कौटुबिंक नाते संबध दृढ करण्याची जबाबदारी ही स्त्रियांवर असते. त्यासाठी कुटूंबात एकमेकांशी संवाद साधणे गरजचे आहे. प्रत्येक स्त्री ही आई झाली पाहिजे मातृत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजली तर जग सुंदर दिसेल असेही डॉ.काणे यांनी सांगितले.
याकार्यक्रमाप्रसंगी  समाजातील विविध स्तरावर उल्लेखनिय काम करणा-या महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये एच.आय.व्ही ग्रस्तांसाठी उल्लेखनिय कार्य करणारे सदस्य, महिला वृध्दाश्रम, बेटी बचाव, बेटी पढाव योजना लाभार्थी, महिला होम गार्ड, महिला वकील संघ, दामिनी पथक, दक्षता पथक व बचत गट यामध्ये उल्लेखनिय काम करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी न्यायाधीश ए.जे. पाटंगणकर, न्या.आर.के.शेख, न्या.आर.ए.सासने, न्या.आर.ए.शिंदे, न्या.एम.व्ही. बुराडे, न्या.एस.एस.आरदवाड, न्या.एस.टी.शिंदे, न्या. बी.ए.कडूसकर, न्या. एस.जी.सरोदे, न्या.डी.यु. रजपूत  विधिज्ज्ञ, परिसरातील महिला, पॅरालिगल व्हालंटियर्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments